पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड बाहेकर, रमेश चंद्रभान बाहेकर, रमेश चंद्रभान भूसेना - हवालदार शौर्यचक्र ६ ऑगस्ट १९७१ रमेश चंद्रभान बाहेकर यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील किन्होळा या गावी झाला. २७ ऑक्टोबर १९९० रोजी ते मराठा लाइट इन्फन्ट्रीत दाखल झाले. ५ जून २००१ रोजी बाहेकर हे जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सुरणकोट भागात एका मोहिमेत सहभागी झाले होते. ते सत्ताविसाव्या राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये कार्यरत होते. या भागात दहशतवाद्यांनी घुसखोरी केलेली होती. त्यामुळे याच भागात सैनिकांनी मोर्चा लावला होता. वादळी वारे आणि पावसात सलग अठ्ठेचाळीस तास या भागात बटालियनने निरीक्षण चालू ठेवले होते. दहशतवाद्यांचा एक गट भारतीय सैनिकांच्या या तुकडीला चुकवत एका ओढ्याजवळून चाललेला या तुकडीला दिसला. त्यांना पाहताच बाहेकर स्वत: पुढे सरसावले. दहशतवाद्यांना अनपेक्षित घेराव घालण्यासाठी त्यांनी तुकडीचे नेतृत्व केले. दहशतवाद्यांनीही या तुकडीवर अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. या गोळीबारात जखमी होऊनही त्यांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. यात त्यांना अपंगत्व आले तरीही या कारवाईतून ते मागे हटले नाहीत. या शौर्याबद्दल त्यांना २६ जानेवारी २००२ रोजी ‘शौर्यचक्र’ प्रदान करण्यात आले. - रुपाली गोवंडे

बेवूर, गोपाळ गुरूनाथ भूसेना - जनरल ११ ऑगस्ट १९१६ - २४ ऑक्टोबर १९८९ गोपाळ गुरूनाथ बेवूर यांचा जन्म मध्यप्रदेशातील शिवनी या गावी झाला. सर गुरूनाथ व्यंकटेश बेवूर यांचे ते सुपुत्र होते. मोठा भाऊ माधव बेवूर यांना दुसर्‍या जागतिक महायुद्धात वीरगती मिळाली. यांच्या विचारांचा जनरल बेवूर यांच्यावर मोठा प्रभाव होता. याच प्रेरणेतून त्यांनी भारतीय लष्करात भरती होण्याच्या निर्णय घेतला. बेवूर यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी झाले. उच्चशिक्षणासाठी ते सिनिअर केंब्रिज येथे झाले. उच्चशिक्षणासाठी ते सिनिअर केंब्रिज तसेच डेहराडून येथील ‘इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी’चे विद्यार्थी होते. १५ जुलै १९३७ रोजी वझिरीस्तान मोहिमेच्या वेळी बेवूर यांच्यावर ग्रीन हॉवर्ड फलटणीची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर त्यांची बदली ५ बलुच येथे झाली. तिथे १९४५ पर्यंत ते सेवेत होते. बेवूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक यशोशिखरे गाठली. क्वेट्टा येथील स्टाफ कॉलेज कोर्समध्ये बेवूर यांचा सक्रिय सहभाग होता. वैशिष्ट्य म्हणजे त्यानंतर शिल्पकार चरित्रकोश ४६९