पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भा , संरक्षण खंड पिंटो, वॉल्टर अॅन्थनी निसर्गजन्य शत्रू व पाकिस्तानी आक्रमणखोरांशी त्यांना सतत लढावे लागले. २९ फेब्रुवारी १९४८ रोजी त्यांचा विवाह इंदुमती पद्माकर देशमुख यांच्याशी झाला. याच दरम्यान त्यांना डेहराडून मिलिटरी अकॅडमीचे चीफ इन्स्ट्रक्टर म्हणून नेमण्यात आले. याच काळात इथियोपियाचे राजे हेले सेलासी यांच्याविरुद्ध तेथील सैनिकांनी बंड केले होते. राजे हेले सेलासी यांनी भारत सरकारला मदतीची हाक दिली. त्याला प्रतिसाद देत भारत सरकारने भारतीय सैन्य इथिओपियामध्ये पाठविले. पाटणकर यांना ब्रिगेडियर म्हणून बढती देऊन त्यांची रवानगी आदिस अबाबा येथे भारतीय सैन्याचे प्रमुख म्हणून करण्यात आली. सैन्यात बंडाळी आणि या राष्ट्राची भाषा येत नसल्याने हिंदी फौजांना ही कामगिरी कठीणच होती. परंतु शांतता प्रस्थापित करून सैन्याला शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी इतके उत्तम केले, की राजे हेले सेलासी यांनी त्यांना ‘इथियोपियन स्टार ऑफ ऑनर ऑफ हाय ऑर्डर’ हा देशातील सर्वोच्च बहुमान दिला. पाटणकर यांना १९६७मध्ये मेजर जनरल म्हणून पदोन्नती मिळाली. जनरल ऑफिसर्स कमांडर म्हणून जम्मू आणि काश्मीर हा भाग त्यांच्या हाताखाली होता. या काळात आंतरराष्ट्रीय सीमारेषेतून होणार्‍या पाकिस्तानी घुसखोरीचे पारिपत्य करण्यासाठी त्यांनी एक विशेष विभाग उघडून नवीन यंत्रणा सुसज्ज केली. बांगलादेश युद्धात आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम या पूर्व विभागाचे जनरल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या सैनिकी जीवनातील असाधारण कर्तृत्वाचा सन्मान म्हणून १९७२मध्ये त्यांना राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांच्या हस्ते ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर १९ डिसेंबर १९७३ रोजी त्यांनी सैन्यातून मेजर जनरल या पदावरून निवृत्ती स्वीकारली. परंतु सरकारने त्यांना कॅबिनेट सेक्रेटरी या पदावर दोन वर्षे नियुक्ती देऊन त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग करून घेतला. त्यानंतर ते आपले जन्मगाव पुणे येथे स्थायिक झाले. पाटणकर यांना ‘परमविशिष्ट सेवा पदका’बरोबर ‘इटली स्टार’, ‘जर्मनी स्टार’, ‘डिफेन्स ऑफ युरोप क्लास ८’ अशी एकूण १६ पदके मिळाली आहेत. - विवेक कुलकर्णी

पिंटो, वॉल्टर अ‍ॅन्थनी भूसेना - लेफ्टनंट जनरल परमविशिष्ट सेवा पदक १ जुलै १९२४ कलाशाखेत इंटरपर्यंतचे शिक्षण घेऊन वॉल्टर पिंटो यांनी अलाहाबाद विद्यापीठातून संरक्षणविषयक पदव्युत्तर (एम.ए. डिफेन्स स्टडीज) शिक्षण घेतले. लष्करी सेवेची आसच त्यांना या क्षेत्रात घेऊन आली. दि.१२ सप्टेंबर १९४३ रोजी त्यांनी सैन्यात प्रवेश घेतला. भूसेनेतील प्रत्यक्ष कार्यात आणि विशेषत: सैन्य प्रशिक्षणात त्यांचे योगदान आहे. सैन्याला प्रशिक्षण देण्यापूर्वी त्यांनी स्वत: जानेवारी ते मार्च १९४९ या कालावधीत महू इथे सैनिकी सेवा प्रशिक्षक पदाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ऑक्टोबर १९५४ ते ऑगस्ट १९५५ दरम्यान वेलिंग्टन इथेही प्रशिक्षणाकरिता सैनिकी सेवेतल्या स्पर्धा-परीक्षांमधून त्यांची निवड झाली. प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव घेतानाच त्यांनी प्रत्यक्ष लष्करी कामातही भाग घेतला. ऑक्टोबर १९५५ ते नोव्हेंबर १९५८ या काळात ते इन्फन्ट्री ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर (सैनिकी व्यवहार व नियोजन) होते. भूसेनेत पुढच्या पदावर गेल्यावरही त्यांनी महू येथे एप्रिल ते जुलै १९६० दरम्यान ज्येष्ठ अधिकार्‍यांसाठी असलेले प्रशिक्षण घेतले.

शिल्पकार चरित्रकोश ४६५