पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंडित, भर्तृहरी त्रिंबक संरक्षण खंड त्यांंनी २३ प्रकारच्या विमानांवर एकंदर ३८०० तासांचे उड्डाण केले. - अविनाश पंडित

पंडित, भर्तृहरी त्रिंबक भूसेना - लेफ्टनंट जनरल महावीरचक्र १७ फेब्रुवारी १९३४ भर्तृहरी त्रिंबक पंडित यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी या गावी झाला. त्यांचे वडील पारवा येथील पारवेकर देशमुख संस्थानिकांकडे मालमत्ता व्यवस्थापक म्हणून काम पाहत असत. भर्तृहरी पंडित यांचे प्राथमिक शिक्षण घाटंजी व पारवा येथे पार पडले. नागपुरातून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी एम.एस्सी., एम.ए., ए.एम.आय.र्उ. अशा पदव्या प्राप्त केल्या. हैद्राबादमधील निजामाचे सैन्य ‘रझाकार’ म्हणून ओळखले जाई. हे रझाकार प्रजेला विनाकारण हल्ले करून त्रास देत असत. पंडितांची मित्रमंडळी व ते स्वत: या काळात या रझाकारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवीत. त्यांच्यामुळे यवतमाळचा टापू रझाकारांपासून सुरक्षित राहिला होता. जून १९५५मध्ये मद्रास सॅपर्समध्ये इंजिनिअरिंग शाखेत सेकंड लेफ्टनंट म्हणून त्यांनी सेवेस सुरुवात केली. १९५९ मध्ये पुणे येथील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयामधून त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवली व १९६४ मध्ये त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमधून प्रशिक्षण घेतले. नागालँड आणि मणिपूर येथील बंडखोरीविरोधी आघाडीच्या सैनिकांच्या नेमणुका करण्यामध्ये आणि सैनिकी मुख्यालयाच्या सैनिकी कारवायांची धोरणे ठरविण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९७१ च्या भारत-पाक युद्धात इंजिनिअर रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांनी काम पाहिले. या वेळी पश्चिमेकडील आक्रमणाविरुद्ध मोहिमा पार पाडताना दाखविलेल्या शौर्याबद्दल व श्रेष्ठ दर्जाच्या नेतृत्वाबद्दल त्यांना ‘वीरचक्र’ देऊन गौरविण्यात आले. पुण्यातील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय, कॉम्बॅट महाविद्यालय व इराकमधील भारतीय सैनिकांच्या प्रशिक्षण पथकासाठी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केले. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षण १९८४ मध्ये पूर्ण केल्यानंतर पंडित यांच्यावर जनरल कॅडरचे कार्य सोपविले गेले. राजस्थानमधील ब्रास टास्क व जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील अशा पूंछ विभागातील ‘ट्रायडंट’ या मोहिमेमध्ये त्यांनी सैनिकी आघाडीचे नेतृत्व केले. १९८९-९० या काळात पंजाबमधील अतिरेकी कारवायांमध्ये खूपच वाढ झाली होती. या वेळी ‘ऑपरेशन रक्षक’ ही मोहीम हाती घेऊन खलिस्तानवादी दहशतवादाचा त्यांनी पराभव केला. जुलै १९९० मध्ये मुख्यालयात ‘अ‍ॅडज्युटंट जनरल’ या पदावर त्यांची नेमणूक झाली. या काळात चीफ ऑफ स्टाफ या नात्याने त्यांनी सर्व सैनिकांच्या कल्याणकारी योजनांवर जातीने लक्ष पुरविले. सेवानिवृत्त सैनिकांच्या कल्याणासही त्यांनी या वेळी विशेष महत्त्व दिले. सैन्याचा विधि विभाग आणि वैद्यकीय सेवा विभाग (१०९ इस्पितळे व सुमारे ५००० वैद्यकीय अधिकारी) यांचे नियंत्रणही त्यांनी या नेमणुकीदरम्यान केले. याशिवाय सैनिकी गृहनिर्माण प्रकल्प, विमा निधी प्रकल्प व शैक्षणिक प्रकल्प यांचे ते पदाधिकारी होते. या काळात सैनिकांसाठी देशभरात सुमारे १२,००० घरे बांधली गेली; विमा निधी प्रकल्पामध्ये १५०० कोटी रुपये गुंतविले गेले व सैनिकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी देशात ६० सैनिकी शाळा सुरू झाल्या.

४६० शिल्पकार चरित्रकोश