पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड निमसे, त्रिंबक दादा कामात ते सहभागी झाले होते. ‘ऑपरेशन पवन’मध्ये ‘पॅराशूट कमांडो टास्क फोर्स’ मध्ये ते कार्यरत होते. भारतात परत आल्यावर त्यांना ‘ब्रिगेडियर’ पदावर बढती मिळाली. लगेचच ‘ऑपरेशन मेघदूत’ ह्या महत्त्वाच्या मोहिमेवर ते सियाचेनमधल्या बर्फाळ भागात रुजू झाले. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक हवामानात युद्धसदृश परिस्थितीत सुमारे अडीच वर्षे काम केल्याबद्दल दि.२० एप्रिल १९९१ रोजी ‘उत्तम युद्ध सेवा पदक’ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. ‘मेजर जनरल’ ह्या पदावर असताना त्यांनी अशांत काश्मीर भागाची जबाबदारी स्वीकारली. १९९३मध्ये तेथे पार पडलेल्या ‘ऑपरेशन रक्षक’ या मोहिमेत एकोणिसाव्या इन्फन्ट्री डिव्हिजनचे नेतृत्व करताना त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. नियंत्रण रेषेजवळ अनेक अतिरेक्यांंना त्यांनी कंठस्नान घातले. या पराक्रमाबद्दल त्यांना १९९६मध्ये ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरवण्यात आले. नानावटी ह्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पदोन्नतीसोबत त्यांनी नवे आव्हान स्वीकारले. ‘लेफ्टनंट जनरल’ पदाची सूत्रे हातात घेतल्याबरोबर नागालॅण्ड, मणिपूर, त्रिपुरा आणि आसाम ह्या राज्यांमध्ये सीमावर्ती भागातून येणार्‍या घुसखोरांच्या अतिरेकी कारवायांना आळा घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ‘ऑपरेशन ऑर्चिड’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ मधील कामगिरीसाठी १९९९मध्ये त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देण्यात आले. ईशान्येकडील राज्यांमधून परत आल्यानंतर त्यांची विनंती लक्षात घेऊन पुन्हा एकदा त्यांना अशांत काश्मीर राज्यात पाठवण्यात आले. सुरुवातीला ते ‘चीफ ऑफ स्टाफ’ होते. ‘जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ म्हणूनही त्यांनी काम केले. ‘ऑपरेशन रक्षक’ आणि ‘ऑपरेशन पराक्रम’ ह्या मोहिमा त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवण्यात आल्या. जेथून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली, त्या आठव्या गोरखा रेजिमेंटचे आधी कर्नल, नंतर संपूर्ण ‘गोरखा ब्रिगेड’चे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. दि.१ जून २००३ रोजी ते निवृत्त झाले. त्यानंतर दि.१ सप्टेंबर २००७ ते दि.३१ ऑगस्ट २००९ ही दोन वर्षे पुणे विद्यापीठाच्या संरक्षण शास्त्र विभागात ‘छत्रपती शिवाजी अध्यासना’चे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. सध्या ‘भारतातील अंतर्गत शस्त्रसंघर्ष’ ह्या विषयावरील शोधनिबंध लेखनात ते मग्न आहेत. एकेकाळी उत्कृष्ट शिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. सध्या ते वन्यजीव, तसेच पर्यावरणाच्या रक्षणाच्या कामात सक्रिय आहेत. - गीतांजली वैशंपायन

निमसे, त्रिंबक दादा भूसेना - हवालदार शौर्यचक्र जन्म-मृत्यू दिनांक अनुपलब्ध त्रिंबक दादा निमसे हे सव्विसाव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या ‘बी’ कंपनीमध्ये कार्यरत होते. ‘बजरंग’ मोहिमेमध्ये दि.१९ मार्च १९९१ रोजी निमसे यांच्या नेतृत्वाखालील तुकडीला एक संशयित दहशतवादी पकडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ज्या शिल्पकार चरित्रकोश ४५७