पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नानावटी, रूस्तुम कैखुश्रू संरक्षण खंड नानावटी, रुस्तुम कैखुश्रू भूसेना - लेफ्टनंट जनरल परमविशिष्टसेवापदक, अतिविशिष्टसेवापदक १८ मे १९४३ रुस्तुम कैखुश्रू नानावटी यांचा जन्म पूर्वीच्या मुंबई इलाख्यात कारवार येथे (उत्तर कर्नाटक जिल्हा) झाला. त्यांचे वडील के.जे.नानावटी हे मुंबई इलाख्यातील प्रख्यात आणि कर्तबगार पोलिस महानिरीक्षक होते. त्यांची आई धन नानावटी ह्या मूळच्या ‘राजपिपला’ ह्या गुजरातमधल्या संस्थानात वाढल्या होत्या. धनजीशा एडलजी कोठावाला हे तिथले दिवाण म्हणजे त्यांच्या आईचे आजोबा. थोडक्यात, प्रशासनात महत्त्वाची जागा भूषवण्याचा वारसा त्यांना माता-पिता, दोन्हींकडून मिळाला होता. नानावटी यांचे शालेय शिक्षण पाचगणीच्या सेंट पीटर्स हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण राजकोट येथील राजकुमार महाविद्यालयामधून आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. परंतु नानावटी यांचे मन शिक्षणात रमले नव्हते. लहानपणापासून त्यांना सैनिकी पेशाचे आकर्षण वाटत होते. किंबहुना तेच त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे जिथे साहस, थरार, शौर्य ह्यांची गरज आहे, अशा जगात ते रमायचे. ते स्वत: उमदे खेळाडू होते. बॉक्सिंग, हॉकी, फुटबॉल या खेळांमध्ये ते तरबेज होते. त्यांचे खेळाचे शिक्षक पीटर रॉजरसन ह्यांच्या तालमीत ते तयार झाले. १९६१मध्ये त्यांनी डेहराडून येथील भारतीय सैनिकी प्रबोधिनीत एकतिसाव्या तुकडीत प्रवेश घेतला. ड्रील, कवायत, मार्क्समनशिप, डावपेच आणि नेतृत्वगुण ह्या सगळ्यांत विलक्षण प्रावीण्य दाखवत ‘बेस्ट ऑलराउण्ड कॅडेट’ असा बहुमान त्यांनी मिळवला. दि.११ डिसेंबर १९६२, रोजी ते आठव्या गोरखा पलटणीच्या दुसर्‍या तुकडीत सामील झाले. महू येथील ‘इन्फन्ट्री स्कूल’मध्ये १९६५ साली त्यांनी शस्त्रास्त्र प्रशिक्षणात बंदूक चालवताना नेमबाजीत विक्रम प्रस्थापित केला. ह्याच विषयातील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यात ‘फोर्ट बेनिंग’ येथील ‘इन्फन्ट्री ऑफिसर्स अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स’मध्ये त्यांना सर्वोच्च श्रेणी मिळाली. तसेच ‘डिस्टिंग्विश्ड अलाइड ग्रॅजुएट’ म्हणून त्यांना गौरवण्यात आले. ‘डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज’ आणि दिल्लीतील ‘नॅशनल डिफेन्स स्कूल’ येथूनही त्यांनी प्रशिक्षण घेतले. प्रस्तरारोहण, नौकानयन, भूमीगत बंकर्समधील चढाई असे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. ‘पहिल्या आर्मर्ड ब्रिगेड’मध्ये ‘ब्रिगेड मेजर’ म्हणून काम केल्यानंतर १९७९मध्ये त्यांनी त्याच बटालियनची सूत्रे हाती घेतली. पंजाब, प.बंगाल, तसेच भूतान येथे त्या काळात त्यांनी काम केले. १९८२ ते १९८५ ह्या कालावधीत ते वॉरमिन्स्टर येथील ‘ब्रिटिश आर्मी स्कूल ऑफ इन्फन्ट्री’ येथे भारतीय सैन्यदलाचे समन्वयक म्हणून कार्यरत होते. १९८७मध्ये श्रीलंकेतील भारतीय शांतिसेनेच्या ४५६ शिल्पकार चरित्रकोश । न ।