पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नातू, अनंत विश्वनाथ संरक्षण खंड आल्या. त्या अहवालानुसार या सर्व संस्थांच्या कार्यप्रणालीत आणि अभ्यासक्रमात आधुनिक काळाला योग्य असे अनेक महत्त्वपूर्ण बदल नंतर लवकरच करण्यात आले. त्यांना १९६९मध्ये ‘विशिष्ट’ सेवा पदक, १९७७ मध्ये ‘नौसेना’ पदक, १९८३ मध्ये ‘अतिविशिष्ट’ सेवा पदक आणि १९८५ मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदका’ने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या दोन मुलांपैकी रवींद्र नाडकर्णी भारतीय नौसेनेत कमांडरपदी कार्यरत आहेत. निवृत्तीनंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले आहेत. ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या संस्थेचे ते एक संस्थापक असून पहिले संचालक होते. संरक्षण विषयातील जाणीव जागृती करण्यात ते आघाडीवर असून या संदर्भातील विविध विषयांवर वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून ते सतत लिखाण करीत असतात. - राजेश प्रभु साळगांवकर

नातू, अनंत विश्वनाथ भूसेना - मेजर जनरल परमविशिष्टसेवापदक, महावीरचक्र १ सप्टेंबर १९२५ अनंत विश्वनाथ नातू यांचा जन्म विदर्भातील अकोला येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अकोल्यातील जठार पेठेतील मॉडर्न शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी नागपूरला जायचा निर्णय घेऊन १९४२मध्ये ते नागपूरला आले. अनंतरावांचे ज्येष्ठ बंधू जे पुढे ‘स्वामी भाष्यानंद’ म्हणून ओळखले जाऊ लागले, ते नागपूरच्या रामकृष्ण मिशनमध्ये राहत असत. अनंतरावही त्यांच्याकडे रामकृष्ण मिशनमध्ये दाखल झाले. १९४५च्या सुमारास नातू यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला व ते ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’मध्ये अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी गेले; पण वायुदलासाठी त्यांना शारीरिकदृष्ट्या अपात्र ठरवण्यात आले. मात्र भूसेनेत त्यांची निवड झाली. त्यांचे सैनिकी प्रशिक्षण बंगळूरच्या ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’त झाले. ऑक्टोबर १९४६मध्ये ते उत्तीर्ण होवून त्यांची नेमणूक फ्रंटियर फोर्स बटालियनमध्ये झाली. ही बटालियन तेव्हा वायव्य सरहद्द प्रांतात कार्यरत होती. २० ऑक्टोबर १९४७पर्यंत ते या बटालियन बरोबरच कार्यरत होते. आपल्या सैनिकी नोकरीच्या प्राथमिक वर्षांमध्ये पठाण सैनिकांवर अधिकारी म्हणून अनंत नातू यांना काम करावे लागले. या कालावधीत हा सैनिक कसा वागतो, कसा विचार करतो व त्याच्या सवयी या सर्वांचा मानसशास्त्रीयदृष्ट्या त्यांना अभ्यास करता आला. आपल्या सैनिकी जीवनात पाकिस्तानी सैन्याशी निरनिराळ्या वेळी झालेल्या चकमकी व युद्धांदरम्यान अनंत नातू यांना त्याचा उपयोग झाला. भारतात २० ऑगस्ट १९४७ रोजी परतल्यावर नातू यांची नेमणूक फिरोझपूर येथे असलेल्या १/९ गुरखा रायफल या रेजिमेंट मध्ये झाली. १९४७ ते १९४९ या कालावधीत ते १/९ गुरखा रायफल या रेजिमेंटचे कंपनी कमांडर होते. याच काळात झालेल्या भारत-पाक युद्धात त्यांनी छांब-नौशेरा भागात झालेल्या युद्धात भाग घेतला होता. पन्नासच्या दशकात २/९ गुरखा रायफलचे कंपनी कमांडर म्हणून त्यांनी काम पाहिले. फिरोझपूर येथील कालावधीत एरिक वाझ या संपूर्ण व्यावसायिक आणि अत्यंत प्रामाणिक व सच्च्या शिपाईगड्याचा ‘गुरू’ म्हणून त्यांना लाभ झाला. (हेच एरिक वाझ पुढे वायुसेनेच्या पूर्व विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ झाले.) त्यांनी १९५५मध्ये वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेज ४५४ शिल्पकार चरित्रकोश