पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड जाधव, नामदेव रामजी सर्व रणगाडे नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचू शकले. भारतीय सैन्य शत्रूला चित करण्यात यशस्वी झाले. या लढाईत जठार यांनी स्वत:च्या सुरक्षिततेची पर्वा न करता दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना १५ ऑगस्ट १९५० रोजी ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले. त्यांनी १९६५ साली गाझामध्ये भारतीय सैन्यातर्फे कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. सातत्याने विविध कामगिर्‍या यशस्वीपणे पार पाडणारे अरविंद जठार १९७५ मध्ये ब्रिगेडियर पदावरून सैन्यातून निवृत्त झाले. त्या वेळी त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. त्यांचे चुलत बंधू स्क्वॉड्रन लीडर मधुकर शांताराम जठार यांनाही पाकिस्तानविरुद्धच्या १९६५च्या लढाईमध्ये ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले आहे. - पल्लवी गाडगीळ

जाधव, तुकाराम वसंतराव भूसेना - नाईक शौर्यचक्र १ जून १९५९ - ३० मार्च २०१० तुकाराम वसंतराव जाधव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात हिंगणे गावी झाला. दहिवडी गावातील महात्मा गांधी विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. २२नोव्हेंबर १९७८ रोजी ‘बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप’ (बी.ई.जी.) मध्ये ते दाखल झाले. १९८५मध्ये हिमवर्षावात श्रीनगर-लेह महामार्गावर ‘जोझी ला’ विभागात एकशे सत्तेचाळिसाव्या कि.मी.जवळ हिम काढण्याच्या कामावर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रतिकूल हवामानात अद्ययावत यंत्रांच्या मदतीने हे काम सुरू होते. जाधव आणि कॅप्टन रस्तोगी हे दोघे २३ मार्च १९८५ या दिवशी काम करत असताना त्यांच्या यंत्रावर बर्फाचा कडा कोसळला. त्यांच्यासह ते यंत्र काही फूट बर्फाखाली दबले गेले. प्रचंड दमलेले असतानादेखील विनाविलंब त्यांनी बर्फामधून आपली सुटका करून घेतली आणि ते मौल्यवान आणि महाग यंत्र बाहेर काढण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर त्यात यशस्वी ठरल्यावर लगेच वैयक्तिक सुरक्षेची पर्वा न करता पुन्हा हिम हटवण्याच्या कामाला सुरुवात केली. काही दिवसांनंतर २९ मार्च १९८५ रोजी ११९२ व्या कि.मी.जवळ बावीस तास सलग काम करून जाधव यांनी आपल्या श्मिड्ट यंत्राद्वारे एकोणीस मीटर उंच आणि दोनशे दहा मीटर लांब उतरता असणारा बर्फाचा कडा फोडला. ९ एप्रिल १९८५ रोजी १०९१ व्या कि.मी.जवळ हिम हटविण्याच्या मोहिमेदरम्यान काम करताना त्यांचे काही सहकारी बर्फाखाली दबले गेले होते. त्या सहकार्‍यांंना त्यांनी बर्फातून बाहेर काढले आणि बर्फाखाली दबलेले बर्फ हटविण्याचे महाग यंत्रसुद्धा त्यांनी बर्फाच्या ढिगाखालून बाहेर काढले. त्याच वेळी थकवा आणि ताण यांनी ग्रस्त आपल्या सहकार्‍याला खांद्यावर टाकून आपला तळ गाठला. या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना ‘शौर्यचक्र’ प्रदान करण्यात आले. ३० नोव्हेंबर १९९५ रोजी ते सैन्यामधून निवृत्त झाले. - रूपाली गोवंडे

जाधव, नामदेव रामजी भूसेना - हवालदार, मानद सुभेदार व्हिक्टोरिया क्रॉस १८ नोव्हेंबर १९२१ - २ ऑगस्ट १९६४ नामदेव रामजी जाधव यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या निमज या गावात झाला. त्यांचे मूळ गाव अहमदनगरमधील वीरगाव हे हाय. त्यांचे वडील हे एक गरीब शेतकरी होते. घरातल्या गरीब शिल्पकार चरित्रकोश