पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग्रीन, जॉनी विल्यम संरक्षण खंड मुख्यालयातल्या एअर स्टाफ इन्स्पेक्शनच्या आयुक्तालयात इनस्पेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच वायुसेनेच्या प्रमुखांचे वायुदल मार्गदर्शक, ऑपरेशन पराक्रमच्या कालावधीत वायुसेनेच्या प्रमुखांचे साहायक, वायुसेनेतल्या प्रशिक्षणासाठीचे कमांडिंग इन चीफ या पदांवर ते कार्यरत होते. वायुसेनेतील अंतिम टप्प्याच्या कार्यकाळात त्यांनी वायुसेनेच्या मुख्यालयात व्हाईस चीफ (उपप्रमुख) या पदावर १नोव्हेंबर२००६पासून भूषण गोखले यांनी काम केले आणि ३१डिसेंबर२००७ रोजी ते या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही गोखले संरक्षणक्षेत्रासाठी सतत काम करीत आहे. निवृत्तीनंतर संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या (डी.आर.डी.ओ.) सल्लागारपदी त्यांची नेमणूक झाली. भूषण गोखले भारत सरकारच्या सेवेत मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा परिषदमध्येही (नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल) ते काम करीत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी ‘परमविशिष्ट सेवा पदक’, ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ आणि ‘वायुसेना पदक’ लाभले आहे. याव्यतिरिक्त १ फेब्रुवारी २००७ रोजी माननीय राष्ट्रपतींच्या सेवेत ए.डी.सी. या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. २२ मे २०१० रोजी झालेल्या मंगळूर विमान अपघाताच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीचे प्रमुख म्हणून गोखले यांनी काम पाहिले. सध्या ते महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आणि विश्वस्तही आहेत. तसेच डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या दोन्ही संस्थांच्या नियामक मंडळावरही (गव्हर्निग काउन्सिल) ते काम पाहत आहेत. - पल्लवी गाडगीळ/रूपाली गोवंडे ग्रीन, जॉनी विल्यम वायुसेना - एअर मार्शल परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, वीरचक्र, वायुसेना पदक २१ मार्च १९२९ - जॉनी विल्यम ग्रीन यांचा जन्म मद्रास (चेन्नई) येथे झाला. १६ जून १९५१ रोजी त्यांची हवाई दलामध्ये नियुक्ती करण्यात आली. १९६५ सालच्या पाकिस्तान युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये स्क्वॉड्रन लीडर जॉनी विल्यम ग्रीन यांनी छांब भागात हल्ला करणार्‍या नॅट विमानांच्या तुकडीचे नेतृत्व केले. याच भागात पाकिस्तान मात्र क्षेपणास्त्रांनी युक्त अशा एफ-८६ सेबर व एफ १०४ स्टारफाइटर यां सारख्या विमानांचा वापर करीत होता. ३ व ४ सप्टेंबर रोजी त्यांनी केलेल्या व्यूहरचनेनुसार शत्रूबरोबर पहिली चकमक सुरू झाली. शत्रूकडील वरचढ युद्धसाहित्याला न जुमानता त्यांनी आपल्या व्यूहरचनेत अशा कौशल्याने बदल केले की त्यामुळे त्यांना या पहिल्याच चकमकीत शत्रूची दोन विमाने टिपता आली. त्याचबरोबर, जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करणार्‍या मिस्टरी व कॅनबेरा विमानांना सुरक्षा पुरवणार्‍या व्यूहरचना त्यांनी वापरल्या. या सर्व हल्ल्यांतील यश हे मुख्यत्वे त्यांचे शौर्य आणि नेतृत्व यांमुळेच मिळाले. ३सप्टेंबर१९६५ रोजी ‘वीरचक्र’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना एअर मार्शल पदापर्यंत बढती मिळाली. ‘परमविशिष्ट सेवा पदक’ ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ व ‘वायुसेना पदक’ असे पुरस्कारही मिळाले. - आनंद गोवंडे

  • * *

४२६ शिल्पकार चरित्रकोश