पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क १९६९मध्ये त्यांना ‘वायुसेना पदक’ देण्यात आले. १९७९मध्ये त्यांना भारतातर्फे संरक्षण व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी अमेरिकेत पाठविण्यात आले. त्यांना १९९५ साली राष्ट्रपतींच्या हस्ते ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देण्यात आले. कुलकर्णी यांनी १९८१मध्ये चेन्नई (तत्कालीन मद्रास) विद्यापीठातून संरक्षण शास्त्रातील एम.एस्सी. अभ्यासक्रम पूर्ण केला. १९८९मध्ये उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी ‘राज्यशास्त्र’ या विषयात पीएच.डी पदवी घेतली. त्यांनी मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन (१९६२), नेव्हिगेशन इन्स्ट्रक्टर कोर्स (१९६२), ज्यूनियर कमांडर कोर्स (१९७१), डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कोर्स (१९७२), अ‍ॅडव्हान्स वर्क स्टडी कोर्स (१९७४), सीनियर डिफेन्स मॅनेजमेंट कोर्स (१९७९), इंटरनॅशनल डिफेन्स मॅनेजमेंट कोर्स (१९७९) असेही अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. १९८३ ते १९८४ या काळात ते वायुदलाच्या बेगमपेट तळावर स्टेशन कमांडर म्हणून कार्यरत होते. सप्टेंबर १९८८ ते १९८९ या काळात चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथे ते कमांडर म्हणून कार्यरत होते. तसेच नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्येही ते काही काळ कार्यरत होते. १९९५मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. वायुसेनेत असताना त्यांनी इजिप्त, अमेरिका, इंडोनेशिया, केनिया, टांझानिया, जपान, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, चीन या देशांना भेटी दिल्या आहेत. वायुसेनेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज येथे संचालक म्हणून दि.१ फेब्रुवारी १९९५पासून काम केले. ‘काउन्सिल फॉर सिक्युरिटी को-ऑपरेटिव्ह इन आशिया-पॅसिफिक इंडिया कमिटी’ (१९९९-२००४), ‘यशदा’च्या संचालक मंडळाचे सभासद (१९९८-२०००), आणि रक्षा प्रबंधन संस्थान व रक्षा महाविद्यालय या संस्थांचे तेे महासंचालक होते. त्यांनी संरक्षणशास्त्राचे व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प यांवर लिखाण केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षा हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होत. - सायली अग्निहोत्री ४१४ शिल्पकार चरित्रकोश