पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क 1. संरक्षण खंड कुलकर्णी, सदानंद कृष्णराव राखीव पोलीस दल, सीमासुरक्षा दल आणि राज्य पोलीस अशा ईशान्य प्रदेशातील सर्व शासकीय संरक्षण संस्था आणि नागा फुटीरतावादी यांच्यामधील दूत म्हणून त्यांनी काम केले. या दोन्ही गटांतील एकमेकांच्या तक्रारी तटस्थपणे कोणालाही झुकते माप न देता सोडवणे, घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहणे आणि ठरलेले नियम दोघांनाही पाळायला लावणे ह्या सर्व गोष्टी तोलामोलाने सांभाळणे ही तारेवरची कसरत त्यांनी लीलया पार पडली. अर्थात हे त्यांच्यासाठी फार मोठे आव्हान होते. त्यांनी आपल्या पदाची बांधीलकी कायमच अधिक महत्त्वाची मानली. दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची वेळोवेळी बैठक घेणे, नागा फुटीरतावाद्यांशी अनौपचारिक संवाद साधणे, एखाद्या ठिकाणी त्यांची उपस्थिती आवश्यक आहे अशा ठिकाणी जातीने भेट देणे आणि समस्येवर तोडगा काढणे ही कामे त्यांना करावी लागत. अनेकदा त्यांना नागा फुटीरतावाद्यांच्या छावण्यांनाही भेट द्यावी लागत असे. अशा वेळी कधी त्यांच्याबरोबर पोलीस संरक्षण असे, तर कधी ते संरक्षणाशिवाय भेटी देत. नागालँडमधल्या सर्व स्तरांतल्या लोकांना त्यांच्याविषयी विश्वास वाटावा म्हणून त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या सर्व भागांतून त्यांनी प्रत्यक्ष प्रवास केला. अध्यक्षपदी जबाबदारी सुरुवातीला एक वर्षासाठी ठरलेली होती, पण प्रत्येक वर्षी ती वाढत जाऊन साडेसात वर्षे म्हणजे २००८पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. ते वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षापर्यंत हे काम करत होते. त्यांनी अनेक जबाबदार्‍या समर्थपणे आणि प्रभावीपणे सांभाळल्या. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठेची ‘आर्मी कमांडर’ ही पदवी मिळाली. संरक्षण दलातील त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक सन्मान देऊन गौरवण्यात आले. १९८१ ते १९८३ या काळात नागालँडमधल्या फुटीरतावाद्यांना नियंत्रणात ठेवल्याबद्दल १९८४मध्ये त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ मिळाले. १९८७च्या सियाचीन युद्धाच्या उत्तम नियोजन आणि कामगिरीबद्दल १९८८मध्ये त्यांना ‘उत्तम युद्ध सेवा पदक’ मिळाले आहे. सैन्यदलातल्या ३७ वर्षांच्या संपूर्ण कामगिरीबद्दल १९९३मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. - मानसी आपटे

कुलकर्णी, सदानंद कृष्णराव वायुसेना - एअर मार्शल परमविशिष्ट सेवा पदक २ जानेवारी १९३७ सदानंद कृष्णराव कुलकर्णी यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सरला होते. त्यांचे शिक्षण पुण्यातील भावे शाळेत झाले. १९५२मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिकनंतर त्यांनी बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेपासूनच ते राष्ट्रीय छात्रसेनेत (एन.सी.सी.) होते. त्यांना लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची आवड होती व त्याला घरच्यांचाही पाठिंबा होता. १९५३मध्ये त्यांनी डेहराडून येथील ‘राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालया’त प्रवेश घेतला. ती त्यांची पहिली तुकडी होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मार्च १९५७मध्ये त्यांनी वायुसेनेत प्रवेश केला. १९५७ ते १९९५ या कालावधीत ते वायुसेनेत कार्यरत होते. भारतीय वायुसेनेच्या सेवेत असताना त्यांनी ४२०० तास उड्डाण केले आहे. त्यांनी १९६५ व १९७१च्या युद्धात भाग घेतला होता. १९६७ ते १९७१ या कालावधीत त्यांना भारतातर्फे इजिप्तमधील अधिकार्‍यांना व विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पाठविण्यात आले. याच काळात शिल्पकार चरित्रकोश