पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कानिया, हरिलाल जयकिसनदास न्यायपालिका खंड प्राज्ञपाठशाळा मंडळ व धर्मनिर्णय मंडळ आणि मुंबईची ब्राह्मणसभा या संस्थांशीही त्यांचा दीर्घ आणि घनिष्ठ संबंध होता. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. गजेंद्रगडकर, एस. एन.; संपादक, ‘महामहोपाध्याय डॉ. पी. व्ही. काणे कमोमरेशन मोनोग्राफ’; मुंबई विद्यापीठ, १९७४.

कानिया, मधुकर हिरालाल भारताचे सरन्यायाधीश १८ नोव्हेंबर १९२७ मधुकर हिरालाल कानिया यांचा जन्म मुंबईला झाला. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. बी.ए.आणि एलएल.बी. या पदव्या संपादन केल्यानंतर सुरुवातीला १९४९-५०मध्ये ते शासकीय विधि महाविद्यालयामध्ये फेलो होते; नंतर १९५६ ते १९६२ या काळात अर्धवेळ प्राध्यापक होते. १९६४ पासून १९६७ पर्यंत ते मुंबई शहर दिवाणी न्यायालयात सहायक सरकारी वकील आणि १९६७ पासून १९६९ पर्यंत सरकारी वकील होते. नोव्हेंबर १९६९मध्ये कानिया यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली; १९७१मध्ये ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. ऑक्टोबर १९८५मध्ये ते उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश झाले आणि जून १९८६मध्ये कायम सरन्यायाधीश. १ मे १९८७ रोजी त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. १३ डिसेंबर १९९१ रोजी ते भारताचे सरन्यायाधीश झाले. १७ नोव्हेंबर १९९२ रोजी ते पदावरून निवृत्त झाले. मुंबई उच्च न्यायालयात अनेक वर्षे न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर तेथेच आधी कार्यवाहक सरन्यायाधीश आणि नंतर कायम सरन्यायाधीश झालेले आणि तेथून सवार्र्ेच्च न्यायालयावर गेलेले न्या. कानिया हे दुसरे आणि शेवटचे न्यायाधीश होत. त्यानंतर नव्या धोरणानुसार आता सरन्यायाधीश नेहमी अन्य उच्च न्यायालयातून येतात आणि बहुतेक वेळा ते मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयावर जातात. उलटपक्षी, ज्येष्ठतेनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधीशांचा क्रमांक उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदासाठी येत असेल, त्यांची अगोदर अन्य कुठल्यातरी (एका किंवा अनेक) उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून बदली होते आणि मग तेथून ते सर्वोच्च न्यायालयावर जातात किंवा त्या उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून निवृत्त होतात.

- शरच्चंद्र पानसे

कानिया, हरिलाल जयकिसनदास स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश ३ नोव्हेंबर १८९० - ६ नोव्हेंबर १९५१ हरिलाल जयकिसनदास कानिया यांचा जन्म सुरत येथे झाला. त्यांचे बी.ए. पर्यंतचे शिक्षण भावनगर येथे झाले. त्यांचे वडील तेथील सामळदास महाविद्यालयामध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते आणि नंतर तेथेच प्राचार्य झाले. याच महाविद्यालयामधून बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हरिलाल मुंबईला आले आणि शासकीय विधि महाविद्यालयामध्ये दाखल झाले. तेथून १९१५मध्ये एलएल.बी. पदवी मिळविल्यावर कानिया उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेची अ‍ॅडव्होकेटची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. अल्पावधीतच मूळ शाखेतील यशस्वी आणि कुशल वकील म्हणून त्यांचे शिल्पकार चरित्रकोश ३८