पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साठे, रामचंद्र दत्रात्रेय प्रशासन खंड पदावर करण्यात आली. या वेळी त्यांनी ग्रामीण दुग्ध योजना सुरू केली. याद्वारे दूध उत्पादकांना दुधाचे कंटेनर आणि फिरत्या गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. १९६० साली साठे यांची नियुक्ती ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव या पदावर झाली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचा कायदा तयार केला तसेच या दोनही योजना संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीपणे कार्यान्वित केल्या. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले त्यावेळी १९६४ ते ६६ या काळात साठे संरक्षण विभागाचे सह सचिव होते. १९६८ साली एका वर्षांसाठी त्यांची नेमणूक नियोजन आयोगाचे अतिरिक्त सचिव या पदावर करण्यात आली. १९६९ ते ७१ या कालावधीत मसुरीच्या लालबहाद्दुरशास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे ते संचालक होते. त्यावेळी पहिल्या महिला आय.पी.एस. डॉ.किरण बेदी या संस्थेत प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या होत्या. १९७३-७६ या कालावधीत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव होते. याच पदावरून ते १९७६ साली निवृत्त झाले. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. - संध्या लिमये

साठे, रामचंद्र दत्तात्रेय सचिव-परराष्ट्रमंत्रालय,राजदूत-चीन,जर्मनी उपायुक्त - द. आफ्रिका १५ एप्रिल १९२२ - ३१ जुलै २००४

रामचंद्र दत्तात्रेय साठे यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गुंटुर येथे  झाला. शालेय वयाचे झाल्यानंतर त्यांना पुणे येथील शिवाजी सैनिकी शाळेत पाठविण्यात आले. नंतर ते डेहराडून येथील ‘डेहराडून स्कूल’ या निवासी शाळेत शिकले. रामचंद्र ऊर्फ राम साठे हे  १९५५ मध्ये स्थापन झालेल्या स्कूलच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होत. शाळेत असताना ते क्रिकेट, हॉकी व टेनिस या खेळांचे कर्णधार होते. ते शाळेचेही गटनायक होते. नंतर राम साठे यांनी सैनिकी शिक्षण घेण्याचे ठरविले व त्याप्रमाणे डेहराडून येथील भारतीय सैनिकी संस्थेमधून १९४१ मध्ये ते किंग्ज कमिशन घेऊन उत्तीर्ण झाले. 

त्यांची नेमणूक त्या वेळच्या बर्मा विभागात सैन्यातील अभियांत्रिकी पदावर झाली. त्यानंतर वयाच्या तेविसाव्या वर्षी राम साठे यांची नेमणूक चीनमधील भारताचे त्या वेळचे प्रतिनिधी के.पी.एस. मेनन यांचे सैनिकी साहाय्यक म्हणून करण्यात आली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा राम साठे यांची नेमणूक नानकिंग येथे होती. त्यानंतर मात्र के.पी.एस. मेनन यांनी स्वत:बरोबर त्यांना विदेश सेवा विभागात नेले. त्यांची या सेवेतील पहिली नेमणूक ही दक्षिण सिनकिआंगची राजधानी कशगर येथे होती. ही जागा ‘जगाचे छप्पर’ म्हणून ओळखली जाते. त्यानंतर स्टॅलिनच्या राजवटीत राम साठे हे रशियामध्ये होते. नंतर माऊमाऊच्या उदयाच्या वेळेस ते केनयात होते. त्यानंतरची त्यांची नेमणूक ही अफगाणिस्तानात होती. त्यानंतर जर्मनीमधील हॅम्बर्ग येथे ते काही काळ होते. तेथे त्यांनी परराष्ट्रातील व्यापाराचा अनुभव घेतला. पुढे काही काळ त्यांनी परराष्ट्र खात्यातील व्यापार विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले. राम साठे यांची विविध देशांत परराष्ट्र खात्यामार्फत नेमणूक झाली होती. १९६२ मध्ये ते आफ्रिकेतील टांगानिका येथे भारतीय उच्चायुक्त म्हणून रुजू झाले. १९६५ मध्ये त्यांनी राष्ट्रीय महाविद्यालयात (प्रबोधिनी) प्रवेश घेतला. तेथे ते एक वर्षभर होते. यानंतर १९६६ मध्ये ते परत चीनला गेले. राम साठे यांच्या सेवेतील बराच काळ हा चीन व इराण ३५८ शिल्पकार चरित्रकोश