पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंगलमूर्ती, माधव केशव प्रशासन खंड केले. त्यांनी वसंतदादा पाटील, शरद पवार, अब्दुल रहमान अंतुले ह्या सर्वांच्या कारकिर्दीत सचिवपद सांभाळले. काही मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात अनेक वादळे उठली, पण मोहनी यांचे काम धुतल्या तांदळासारखे स्वच्छच राहिले. कोणत्याही टीकाकारांना एकही संधी त्यांच्या प्रशासन शैलीने दिली नाही. प्रशासन सेवेच्या शेवटच्या टप्प्यात मोहनींची उपलोकायुक्त म्हणून नेमणूक झाली. नंतर पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरूपद त्यांना चालून आले पण वयोमर्यादेमुळे ते ते स्वीकारू शकले नाहीत. ते निवृत्त झाले आणि कुठल्याही पदांच्यापासून अलिप्त राहून जनसेवेच्या नव्या जबाबदार्‍या आणि नवी आव्हाने त्यांनी पेलली. - सुनंदा कुलकर्णी

मंगलमूर्ती, माधव केशव उच्चायुक्त - द.आफ्रिका ४ मे १९३८ माधव केशव मंगलमूर्ती यांचा जन्म मध्यप्रदेशातील (त्या काळातील मध्यप्रांत) जबलपूर येथे झाला. त्यांचे वडील केशव मंगलमूर्ती हे आय.सी.एस. अधिकारी होते. ते नागपूर येथे काही काळ न्यायाधीश होते. नागपूर विद्यापीठाचे उपकुलगुरुपदही त्यांनी भूषवले. माधव यांच्या आईचे नाव मालती असे होते. मंगलमूर्ती यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरमधील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. नागपूर येथील गव्हर्नमेंट ऑफ सायन्स महाविद्यालयातून त्यांनी गणित या विषयात एम.एस्सी. केले. वडील आय.सी.एस. असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत आपण काम करावे असे वाटत असे. १९६१ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. भारतीय परराष्ट्र सेवेत जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये ते तिसर्‍या स्थानावर होते. सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हेदेखील या तुकडीमध्ये होते. नोव्हेंबर १९६२ मध्ये त्यांची प्रथम नियुक्ती अर्जेंटिनाची राजधानी बुएनस आयरेस (र्इीशपेी अळीशी) येथील भारतीय दूतावासात तृतीय सचिव (थर्ड सेक्रेटरी) म्हणून करण्यात आली. स्पॅनिश भाषा शिकणे हा येथील नियुक्तीचा मुख्य उद्देश होता. स्पॅनिश भाषा अवगत केल्यानंतर माधव मंगलमूर्ती यांची नियुक्ती चिली देशाची राजधानी सॅटियागो येथे द्वितीय सचिव या पदावर करण्यात आली. पेरू आणि कोलंबिया या चिलीच्या शेजारील देशांशी भारताचा परराष्ट्र व्यवहार सॅटियागो या शहरातूनच चालत असे. त्याची जबाबदारी मंगलमूर्ती यांच्यावर होती. १९ जुलै १९६५ रोजी मंगलमूर्ती यांना पदोन्नती देण्यात येऊन त्यांची नियुक्ती कराची येथे द्वितीय सचिव, राजकीय (सेकण्ड सेक्रेटरी, पोलिटिकल) या पदावर करण्यात आली. त्यानंतर पुढील एक ते दीड महिन्यातच भारत-पाक युद्ध सुरू झाले. पाक सरकारने भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना स्थानबद्ध केले. त्यांच्या सामानाची/कागदपत्रांची कसोशीने तपासणी करण्यात आली. अशा मोक्याच्या प्रसंगी मंगलमूर्ति यांनी त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने भारत सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गुप्त कागदपत्रे पाकिस्तानच्या हाती सापडणार नाहीत याची काळजी घेतली. युद्धसमाप्तीनंतर साडेतीन वर्षांच्या कालावधीसाठी मंगलमूर्ती यांची नेमणूक पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे करण्यात आली. १९६८ मध्ये मंगलमूर्ती यांची नियुक्ती दिल्ली येथे अंडर सेक्रेटरी, परराष्ट्र मंत्रालय या पदावर करण्यात आली. १९६९ ते १९७२ या काळात त्यांच्यावर परराष्ट्र मंत्रालयाच्या आग्नेय आशिया (साउथ-ईस्ट आशिया) या विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी होती. १९७३ मध्ये मंगलमूर्ती यांची ३२४ शिल्पकार चरित्रकोश