पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मेहेंदळे, लीना प्रशासन खंड त्यांचे व्यक्तिगत ग्रंथालय समृद्ध असून त्यांनी मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिखाण केले आहे. दोन कादंबर्‍या व सुमारे १२५ लघुकथा अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे आत्मचरित्र ‘वृत्तमानस’ या वृत्तपत्राने क्रमश: प्रसिद्ध केले होते. - विनय वसंत मावळणकर

मेहेंदळे, लीना अतिरिक्त मुख्य सचिव-महाराष्ट्र राज्य सचिव-सामान्य प्रशासन विभाग ३१ जानेवारी १९५० लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव नीला असे होते. बिहार राज्यातील दभर्का या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे वडील डॉ.बलराम सदाशिव अग्निहोत्री हे मिथिला संस्कृत संशोधन संस्थेमधे तत्त्वज्ञान आणि संस्कृत या विषयांचे प्राध्यापक होते. त्यांनी अर्थशास्त्र या विषयात नागपूरच्या एस.एन.डी.टी.महाविद्यालयातून पदवी संपादन केली. नंतर १९७० साली त्यांनी पटना विद्यापीठातून भौतिकशास्त्र या विषयात एम.एस्सी.ची पदवी संपादन केली. १९८९ साली त्यांनी इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून ‘प्रकल्प नियोजन’ या विषयात एम.एस्सी. पूर्ण केले. १९७४ साली भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळाले. महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, औद्योगिक विकास, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकास, कार्यालयीन कामकाजात संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रशासनाच्या सर्वच क्षेत्रातील विषय त्यांनी कौशल्याने हाताळले आहेत. सांगली महानगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीच्या जिल्हाधिकारी, पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळ पुण्याच्या अध्यक्षा अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले.सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्यात देवदासींची अनिष्ट प्रथा पाळली जात असे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळेच समाजातील वाईट लोकांकडून देवदासींचे शोषण केले जाते, हे लीना मेहेंदळे यांच्या लक्षात आले. त्यांनी देवदासींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचा अभिनव उपक्रम अवलंबला. सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी एकात्मिक ग्रामविकास योजनेअंतर्गत देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनाचे काम केले. या योजनेअंतर्गत देण्यात येणार्‍या व्यावसायिक प्रशिक्षणाचा कालावधी खूपच कमी होता. मेहेंदळे यांनी हा कालावधी वाढवून घेतला. जत तालुक्यातील सरकारी जमिनीवर देवदासींसाठी घरे बांधून देण्यात आली. त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. देवदासींना यंत्रावर लोकरीचे विणकाम, लोकरीच्या कपड्याचे पॅकींग, मार्केटींग या सर्व गोष्टी शिकवण्यात आल्या. देवदासींनी तयार केलेल्या लोकरीच्या उत्पादनांना पश्‍चिम महाराष्ट्र विकास मंडळाच्या मार्फत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. सरकारमार्फत विविध ठिकाणी भरवण्यात येणार्‍या विक्रीमेळ्यांमध्ये या वस्तूंची विक्री होऊ लागली. लांबच्या गावातून प्रशिक्षणासाठी येणार्‍या देवदासींना सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या व या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्‍वास जागवण्याच्या कामी लीना मेहेंदळे यांनी पुढाकार

म | ३१८ शिल्पकार चरित्रकोश