पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भिडे, बाळकृष्ण त्र्यंबक प्रशासन खंड इंटिग्रल कोच फैक्टरी, चेन्नई वापरण्याचा प्रयत्न केला. या वेळी नवीन निर्माण केलेल्या मीटर गेजच्या डब्यात एक मोठी समस्या उभी राहिली. त्या डब्यांची चाके अल्पावधीत झिजत असल्याचे दिसून आले. या प्रश्नाचा विचार करून ज्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे हे घडत होते. त्याचे मूळ शोधण्यात आले व निरनिराळ्या रेल्वेकडे जावून योग्य ती सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन केले. अशाप्रकारे एक मोठा प्रश्न सुटला. याच काळात त्यांनी “आयसीएफ मधील उत्पादन व पुनरावलोकनाची अवश्यकता” हा निबंध लिहीला. याला ‘रेल्वे मिनिस्टर्स अ‍ॅवॉर्ड ’ मिळाले आणि १९७१ साली त्यांची ‘ब्युरो ऑफ पब्लिक इंटरप्रायजेस’च्या संयुक्त संचालकपदी नेमणूक करण्यात आली. भिडे यांनी व्यवस्थापनविषयक भरपूर संशोधन करून वेगवेगळे निबंध व छोटी-मोठी पुस्तके लिहिली आहेत. देखभाल, इन्सेटिव्हज आदी विषयावर वेगवेगळे सुधारणात्मक कार्य केले. याच कालावधीत पश्चिम बंगालमधील कामगार संघटनांच्या भूमिकेमुळे व स्वार्थी व्यवस्थापनामुळे कोलकाता येथील इंडिया मशिनरी कंपनी डबघाईला आली होती. तिचे व्यवस्थापन केंद्र सरकारने आपल्या हातात घेतले व भिडे यांची त्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली. अशा परिस्थितीत भिडेंनी तब्बल तीन वर्षे या ठिकाणी पाय रोवून कार्य केले. पूर्णत: डबघाईला आलेल्या या कंपनीला भिडेंनी आर्थिक संकटातून बाहेर काढले. पश्चिम बंगालचे उद्योगमंत्री डॉ.कन्हाईलाल भट्टाचार्य यांनी त्यांचे काम पाहून त्यांना याच पदावर कायम राहण्याची विनंती केली. पण भिडे यांनी ती स्वीकारली नाही. पुढे ते रेल्वे सेवेत परत आले नंतर पूर्व रेल्वे, दक्षिण रेल्वेत विभागीय व्यवस्थापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. नंतर १९९०च्या मे महिन्यात त्यांची नेमणूक चेन्नईच्या कोच फॅक्टरीत महाव्यवस्थापक म्हणून झाली. भिडेंनी याच ठिकाणी सर्वांत कनिष्ठ पदावरून आयुष्याची सुरुवात केली होती. त्याच ठिकाणी त्यांना सर्वोच्च पदावर बसण्याचा बहुमान मिळाला. निवृत्तीनंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सल्लागार म्हणून काम केले. ‘पॅलेस ऑन व्हिल्स’ ही राजस्थानातील महत्त्वपूर्ण रेल्वे बनवण्याचेही महत्त्वाचे काम त्यांनी केले. रेल्वेत चौकशी अहवालासाठीही त्यांनी निवृत्तीनंतर महत्त्वाचं काम केले. सध्या ते पुण्यातच निवासाला असतात. - दत्ता कानवटे

३०८ शिल्पकार चरित्रकोश