पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड भिडे, बाळकृष्ण त्र्यंबक केंद्र सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मारुती उद्योग, भेल, स्कूटर इंडिया लिमिटेड, अवजड अभियांत्रिकी निगम (हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन) या देशातील प्रमुख उद्योगांच्या संचालक मंडळाचे ते सदस्य होते. या सर्व जबाबदार्‍या पार पाडताना सर्वसामान्य जनतेला उपकारक अशा भूमिका ते घेत असत. ३६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतून ते २००८ मध्ये निवृत्त झाले. ‘न्यूक्लिअर’ मॅग्नेटिक रेझोनन्स टेक्निक्सचे मॉलेक्युलर असोसिएशन या विषयावरील शोधनिबंधाचे त्यांनी सहलेखन केले. त्यानंतर त्यांनी देशाच्या विविध भागांत ‘सॅनिटेशन’ला चालना देणार्‍या ‘फिनिश’ या कंपनीत कार्यभार स्वीकारला. आपल्या सर्व यशाचे श्रेय आपले मार्गदर्शक आणि लोकांनी दिलेले आशीर्वाद यांच्याकडे जाते, असे ते कृतज्ञतेने म्हणतात. - सुनिता लोहोकरे

भिडे बाळकृष्ण त्र्यंबक विभागीय व्यवस्थापक - रेल्वे संचालक - इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई ३० ऑक्टोबर १९३५ प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पदापर्यंत पोहोचलेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे बाळकृष्ण त्र्यंबक भिडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या पाले या गावी झाला. कुटुंबाचा व्यवसाय हा शेती होता. वडील त्र्यंबक हरी भिडे हे पोस्टात कार्यालय अधिक्षक (ऑफीस सुपरीटेंडंट) होते. आईचे नाव गंगाबाई होते. भिडे बारा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. घरची हलाखीची परिस्थिती शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण झाल्या. परंतु परीक्षेत पहिला क्रमांक सतत मिळवत गेल्यामुळे मिळणार्‍या बक्षिसांच्या रकमांतून त्यांना शिक्षणासाठी खर्च करणे सोपे गेले. त्यांची वक्तृत्वकलाही चांगलीच फुलली असल्यामुळे विविध बक्षिसे मिळवत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. भिडेंचा १९५१ साली शालान्त परीक्षेत ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून ठाणे केंद्रात पहिला नंबर आला. नंतर त्यांनी नारायण टोपीवाला महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु ते महाविद्यालय बंद पडल्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी १९५२ साली पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात यावे लागले. १९५३ साली इंटरला ते फर्गसन महाविद्यालयातून ते विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. कला-विज्ञान शाखेतही गणितात प्रथम येण्याचे बक्षीस त्यांना मिळाले. १९५६ साली ते पुण्याच्या सी.ओ.ई.पी मधून बी.ई.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर डिसेंबर १९५६ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ते संपूर्ण भारतातून दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. परंतु त्यांच्यासमोर शारिरीक चाचणीचे संकट उभे राहिले. परंतु त्यांनी नियमित व्यायाम करून तब्येत सुधारली आणि १९५८ साली त्यांची रेल्वेत नियुक्ती झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९६० साली पहिल्यांदा त्यांची इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे नियुक्ती झाली. सहाय्यक कार्य व्यवस्थापक या पदावरून त्यांनी कारकीर्दिला सुरवात केली. त्यांचे सर्व अहवाल हे काटेकोर बिनचूक असत. काम वेळेत आणि अगदी व्यवस्थित होत असे. १९६७ साली भारतीय रेल्वेने १२ जणांचा एक गट अभ्यासासाठी जर्मनीला पाठवायचे ठरवले अणि त्यात भिडेंची निवड करण्यात आली. जर्मनीत अनेक ठिकाणी त्यांनी अभ्यास केला. नीट अभ्यास करता यावा यासाठी त्यांनी जर्मन भाषाही अवगत केली. १४ महिने अभ्यास करून भारतात परत आल्यानंतर त्यांनी जर्मनीतील तंत्रज्ञान भारतीय रेल्वेचे डबे बनवण्यात शिल्पकार चरित्रकोश ३०७