पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भडकमकर, आनंद वामन प्रशासन खंड भ भडकमकर, आनंद वामन नियोजन सचिव, महाराष्ट्र राज्य ६ ऑगस्ट १९४२ - ३ डिसेंबर १९९३ आनंद भडकमकर यांचा जन्म व शिक्षण नागपूर येथे झाले. नंतर शॉट सर्व्हिस कमिशनद्वारा त्यांनी सेनादलात प्रवेश केला व तेथील कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय प्रशासन सेवेमध्ये (महाराष्ट्र केडर) प्रवेश केला. त्यांनी पुणे व नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी, मराठवाडा विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक इ. पदांवर असताना लक्षणीय कार्यकौशल्य दाखविले. तसेच त्यांनी टेक्सकॉम व गोदावरी गारमेण्टस् इ. उप कंपन्यांची स्थापना करून मराठवाड्यात वस्त्रोद्योग रुजविण्याचे कार्य केले. महाराष्ट्र राज्याचे दिल्ली येथील विशेष आयुक्त, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक, राज्याचे उद्योग आयुक्त व सचिव इ. पदांवर काम करताना राज्यात औद्योगिक गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले व त्यात चांगले यश मिळवले. राज्याचे नियोजन सचिव पदावर कार्यरत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईत आकस्मिक निधन झाले. त्यांचे चाहते व मित्र परिवाराने “कै.आनंद भडकमकर मेमोरियल ट्रस्ट’ ही संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक कार्य केले जात आहे. - प्रभाकर करंदीकर

भावे, चंद्रशेखर भास्करराव अध्यक्ष-सेबी २८ ऑगस्ट १९५० चंद्रशेखर भास्करराव भावे यांचा जन्म नागपूर येथे झाला. तेथेच त्यांचे बालपण व्यतीत झाले. वडील रेल्वेत अधिकारी होते. चंद्रशेखर यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरला येथे झाले. शाळेत त्यांचा कायम प्रथम क्रमांक येत असे. शालान्त परीक्षेत देखील ते बोर्डात प्रथम आले. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी (विद्युत) शाखा निवडली. ही पदवीदेखील त्यांनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. जबलपूरला अभियांत्रिकीचा अभ्यास करताना प्राध्यापक भटनागर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पुढे कोण होणार असे विचारले होते. विद्यार्थ्यांनी त्याची वेगवेगळी उत्तरे दिली. चंद्रशेखर भावे मात्र अंतर्मुख झाले. त्याच क्षणी विचार करताना चंद्रशेखर भावे यांनी आपली आवड प्रशासकीय सेवेत आहे हे ओळखले आणि ते कठोर परिश्रम करून आय.ए.एस. झाले. प्रारंभी त्यांनी नगरच्या पारनेर तालुक्यात प्रांताधिकारी म्हणून कार्य केले. नांदेड व नाशिक जिल्ह्यातही सेवा बजावली. नांदेडला अभूतपूर्व महापूर आला, तेव्हा नागरिकांना वेगाने सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांची भोजनाची व्यवस्था करणे, त्यासाठी गुरुद्वारा व शहरातील व्यापारी वर्गाची मदत घेणे आदी ३०४ शिल्पकार चरित्रकोश