पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बापट, श्रीकांत कृष्णाजी प्रशासन खंड करण्याचा केलेला प्रयत्न, उद्योगविषयक मूलभूत संस्थांची केलेली स्थापना, महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ, पिंपरी-चिंचवड परिसरात उभारलेला टाटा उद्योग समूह, कृष्णा-गोदावरी पाणीतंटा आदी कामांच्या संदर्भात बर्वे यांनी निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे पुणे परिसरात नवीन मोठ्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली गेली. मुंबईचा विकास साधताना ‘वांद्रे-कुर्ला खाडीत भर घालावी’ आणि ‘त्या जागेचा उपयोग मध्यमवर्गीय व गरिबांच्या घरांसाठी करावा’, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. बर्वे यांनी शासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष म्हणून एक कडक अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षावर सप्रमाण टीका केली. तत्कालीन नेते यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसजनांना हा अहवाल गांभीर्याने घेण्यास सुचवले होते. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी बर्वे यांना राजकारणात आणले. बर्वे यांनीही महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘समंजस नेतृत्वाला’ साथ द्यायचे ठरवले. १९६१ मध्ये त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला. १९६२ मध्ये त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते आपली प्रतिमा व कार्याच्या बळावर विजयी झाले. १९६२ च्या राज्य मंत्रिमंडळात त्यांच्याकडे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. पुढेे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी उद्योग खात्याची जबाबदारी दिली. ठाणे, बेलापूर, खोपोली, पनवेल, चिपळूण, औरंगाबाद येथील औद्योगिक विकासाची मुळे ही बर्वे यांच्या कारकिर्दीतली आहेत. १९६५ च्या दरम्यान बर्वे यांची केंद्रीय नियोजन आयोगाचे (उद्योग) सदस्य म्हणून नेमणूक झाली. महाराष्ट्रातील नेते अन्य राज्यांतील नेत्यांप्रमाणे आपल्या राज्याच्या मागण्या दिल्लीदरबारी पुढे रेटण्याकरिता एकत्र येत नाहीत, हे कटू वास्तव त्यांनी अनुभवले. तसेच नियोजन उत्तम प्रकारे केल्यावरही त्याची अंमलबजावणी किमान कार्यक्षमतेइतकीसुद्धा होत नाही, हेही त्यांच्या नजरेला आले. हे मुद्दे बर्वे यांनी परखडपणे मांडले होते. कोणत्याही पदावरून काम करताना त्यांनी परखडपणा, निर्भीडपणा कधीही सोडला नाही. कातडी बचाव - खुर्ची बचाव असली कार्यपद्धती त्यांना माहीतच नव्हती. ‘सत्त्वाचा आणि तत्त्वाचा आग्रह व त्यासाठी कोणताही त्याग करायची तयारी’; त्याबाबत ते डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे निष्ठावान अनुयायी होते. सदाशिव बर्वे राज्यसभेवर सहजपणे खासदार होऊ शकले असते. पण त्यांनी १९६७ ची ईशान्य मुंबईची निवडणूक लढवली. काँग्रेसने बर्वेंना तिकीट दिले व आपल्याला नाकारले म्हणून कृष्ण मेनन यांनी बंड केले. ‘हा नेहरूंचा अपमान’ असा कांगावा केला. मेनन यांनी निवडून येण्यासाठी शक्य तितके अनेक मार्ग वापरले. नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेने बर्वे यांना पाठिंबा दिला. ही निवडणूक राज्यात व देशात गाजली. बर्वे यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही गैरमार्गाचा वापर न करता त्यांनी विजय मिळवला आणि जनता सामाजिक कामाला महत्त्व देते हे सिद्ध केले. निवडणूक जिंकल्यानंतर पुढील वाटचालीच्या दृष्टीने बर्वे दिल्लीला गेले. त्यांना अर्थ किंवा उद्योग खाते मिळणार हे स्पष्ट होते. पण दिल्ली येथेच सदाशिव बर्वे यांचे दु:खद निधन झाले. - बळवंत शंकर बर्वे/विनय मावळणकर

बापट, श्रीकांत कृष्णाजी भारतीयपोलीससेवा,पोलीसआयुक्त-मुंबई, अधिक्षक-गुप्तचर खाते ६ ऑक्टोबर १९३७ श्रीकांत कृष्णाजी बापट यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीला होते. त्यांचे वडील रमणबाग शाळेत उपमुख्याध्यापक होते. त्यांना २९६ शिल्पकार चरित्रकोश