पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फोर्जेट, चार्लस् प्रशासन खंड होते. तेव्हा गोविंद फडकेंनी एक कल्पना मांडली. लोखंड बनवताना शिल्लक राहणारी पंचवीस ट्रेन राख पोलादपूरहून आणली गेली व खचलेला भराव पूर्ण करून रेल्वेमार्ग उभारण्यात आला. त्यांच्या या अभूतपूर्व कार्यावरून तेंव्हाच्या कलकत्ता मेट्रो रेल्वेचे महाप्रबंधक एम.एस.मुखर्जींनी त्यांची मेट्रो रेल्वेच्या कामात मुख्य अभियंता म्हणून नेमणूक केली. १९७२मध्ये सुरुवात झालेल्या पूर्णत: जमिनीखालून जाणार्‍या मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा १९८४मध्ये पूर्ण झाला. या रेल्वे प्रकल्पाला जगातील सर्व मेट्रो रेल्वेंचे निरीक्षण केलेल्या कॅनेडियन सरकारच्या खास वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने अगदी दहा पैकी दहा गुण दिले ही भारतीय अभियंत्यांच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. त्या वेळचे रेल्वेमंत्री मधू दंडवते हे मेट्रो प्रकल्पाच्या विरोधात होते. तेव्हा फडके यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना प्रकल्पाचे महत्त्व विशद करून सांगितले. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक मदत तातडीने मिळाली व अल्पावधीतच हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने निघाला. पावसाळा लागल्यामुळे मेट्रोच्या खड्ड्यात पाणी जाऊ नये म्हणून रस्त्यात भिंती उभारल्या होत्या. भिंतीबाहेर भरपूर पाणी साचले. रस्त्याच्या शेजारील दुकानांत पाणी घुसले आणि संतप्त लोकांनी भिंती पाडून टाकल्या. मेट्रो रेल्वेच्या बोगद्यात पाणी घुसले. गाळ साचला व इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद पडल्या. त्यांनी पुन्हा बोगद्यातले पाणी व गाळ काढला, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बदलली. इंदिरा गांधी यांच्या हस्ते या रेल्वेचे उद्घाटन होणार होते, पण त्याच वेळी त्यांची हत्या झाली. परंतु तेव्हा अभियंत्यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीला न बोलवता या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन केले. देशातला हा पहिला प्रकल्प असेल, की ज्याचे उद्घाटन अभियंत्यांनी केले. ही रेल्वे सुरू होऊन २५ वर्षे झाली तरी एकही अपघात झाला नाही, हेच या प्रकल्पाच्या यशस्वितेचे उदाहरण आहे. गोविंद फडके यांची नेमणूक नंतर वेस्टर्न रेल्वेच्या प्रमुखपदी मुख्य अभियंता म्हणून झाली. १९९२ साली ते नॉर्थ ईस्ट फ्राँटीयर रेल्वेच्या महाव्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही मुंबईतील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर या प्रकल्पाचे प्रकल्प सल्लागार म्हणून त्यांनी चार वर्षांपर्यंत काम केले. वरील रेल्वे स्थानकांवर रंगीबेरंगी काचा लावून सूर्याचा वेगवेगळ्या रंगांतला प्रकाश पडल अशी त्यांची अभिनव रचना करण्यात आली. या संकल्पनेचेे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात आले. सध्या गोविंद फडके पुण्यातच निवासाला असतात. - दत्ता कानवटे

फोर्जेट, चार्लस् पोलीस सेवा गुप्तचर विभाग जन्म-मृत्यू दिनांक अनुपलब्ध चार्लस् फोर्जेट यांचा जन्म भारतात चेन्नई (मद्रास) येथे झाला. स्थानिक चालीरीती आणि बोलीभाषांचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. ते वेशांतर करून शहरात हिंडत असत. फोर्जेट यांचा वर्ण आणि शारीरिक ठेवण भारतीयांसारखी होती. त्यामुळे स्थानिक लोकांना २९२ शिल्पकार चरित्रकोश