पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोसेफ, डॅनिअल ट्रेव्हेलिन प्रशासन खंड महानगरपालिकेला जमीन संपादित करता यावी यासाठीचे नियम जोसेफ यांच्या कार्यकाळात लागू करण्यात आले. १९९६ मध्ये त्यांची नियुक्ती झोपडपट्टी पुनर्वसन अधिकार विभागाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली. त्यानंतर ‘एसआयसीओएम’ चे महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९९ मध्ये जहाज व्यवस्थापनाचे संचालक म्हणून जोसेफ यांची नियुक्ती झाली. ते केंद्र सरकारच्या जहाज व्यवस्थापन मंत्रालयाचे सचिव म्हणून २००५ मध्ये निवृत्त झाले. या त्यांच्या कार्य काळात त्यांनी समुद्रविषयक प्रशिक्षणासाठी खाजगी संस्थांना अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. वल्लारपदम, सेतुसमुद्रम यासारखे प्रकल्प त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाले. निवृत्त झाल्यावरही काही काळ या मंत्रालयाच्या सल्लागारपदी त्यांची नियुक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. - आशा बापट

ज| २५६ शिल्पकार चरित्रकोश