पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणून कामकाज केले. न्या. भरूचा यांनी एक कडक शिस्तीचा मुख्य न्यायमूर्ती म्हणून लौकिक मिळविला. सध्या नि:स्पृह, निर्भीड व कार्यक्षम असा लौकिक असणारे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्या. एस.एच. कपाडिया यांच्या नेतृत्वावर देशाच्या न्यायपालिकेचा भार आहे. | मुंबई उच्च न्यायालय' असा शब्दप्रयोग या प्रस्तावनेत सोयीसाठी केलेला आहे. वास्तविक पाहिले तर हे नाव ब्रिटिश राणीच्या आज्ञेने ‘हायकोर्ट ऑफ ज्युडीकेचर अॅट बाँबे ठरविण्यात आले होते. अगदी अलीकडील काळात “सतीश दत्तात्रय नाडगौडा वि. महाराष्ट्र राज्य इतर' (२००७(३) बाँबे केस रिपोर्टर पान ७६१) या प्रकरणात निकाल देताना द्विसदस्य न्यायपीठाने गोवा राज्याच्या निर्मितीनंतर उच्च न्यायालयाने जुने नाव चालू ठेवणे अयोग्य आहे असे मतप्रदर्शन केले. त्यानुसार आता फक्त हायकोर्ट अॅट बाँबे' असे नामकरण झालेले आहे. सदर प्रस्तावना ही न्यायपालिकेचा इतिहास सांगण्यासाठी नाही. तसेच प्रत्येक न्यायमूर्तीच्या कार्याचा आढावा घेणेसुद्धा शक्य होणार नाही. परंतु न्यायपालिकेची वाटचाल महाराष्ट्रात कशा प्रकारे झाली याचा धांडोळा घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. या शिल्पकार कोशातील न्यायालयीन कालखंडाची साधारणपणे कल्पना यावी म्हणून हा लेखनप्रपंच. - न्या. विकास रामचंद्र किनगावकर (निवृत्त न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ) शिल्पकार चरित्रकोश न्यायपालिका खंड | २३

-

- = - =-