पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

\ /| पोलीस सेवे प्रशासन खंड गवई, मधुकर गणेश त्यानंतर मात्र काही काळाने या कार्यक्षम दलित अधिकार्‍यावर काहीसा अन्याय झाला आहे याची जाणीव होऊन राजीव गांधी यांनी गवई यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद देऊ केले. परंतु एकदा राज्यपालपद भूषवलेल्या अतिशय स्वाभिमानी अशा गवई यांनी हे पद नाकारले. यानंतर काही काळाने गवई यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांना १९९१ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत बुलढाणा मतदार संघातून उभे केले. ते प्रचंड बहुमताने जिंकणार असे स्पष्ट संकेत असतानाच २१मे१९९१ रोजी राजीव गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली. त्यामुळे उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत गवई पराभूत झाले. भाजपात त्यांच्या प्रशासकीय कौशल्य व अनुभव यांचे योग्य चीज करून घेतले नाही असे वाटल्यामुळे भाजप सत्तेवर येण्याच्या केवळ सहा महिने आधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर गवई यांची प्रकृती ढासळत गेली. शिखविरुद्ध दंगलीत चौकशीसाठी नेमलेल्या नानावटी आयोगासमोर त्यांच्या एका सहकार्‍याने त्यांच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली. या कारणाने नानावटी आयोगाने आपल्या अहवालात गवई यांच्यावर ठपका ठेवला. याविरुद्ध गवई यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित असतानाच त्यांचा मूत्रपिंड विकाराने मृत्यू झाला. - अरुण पाटणकर

गवई, मधुकर गणेश पोलिस महासंचालक २१ मार्च १९२१ - जुलै २००४ मधुकर गणेश गवई यांचा जन्म अमरावती येथे एका दलित कुटुंबात झाला. त्यांचे वडील गणेश आकाजी गवई सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. भारतीय संसदीय कायदा (१९३५) यानुसार निर्माण झालेल्या कायदे मंडळाच्या मध्य प्रांत आणि वर्‍हाड याचे ते निवडून आलेले सदस्य होते. मधुकर गवई यांनी अमरावती येथील किंग एडवर्ड महाविद्यालयामधून (आताचे विदर्भ महाविद्यालय) बी.ए. पदवी प्राप्त केली. १९५९मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेमध्ये निवड झाली. मधुकर गवई हे दलित समाजातून आय.पी.एस. उत्तीर्ण झालेले पहिलेच अधिकारी होत. आपल्या कार्यकालात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पोलीस अधीक्षक हे महत्त्वाचे पद भूषविले. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख या महत्त्वाच्या जबाबदार्‍याही त्यांनी पार पाडल्या. मधुकर गवई यांना मुंबई, पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांच्या पोलीस आयुक्तपदी काम करणारे पहिले अधिकारी असण्याचा मान मिळाला. त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच विशेष पोलीस सेवेसाठी देण्यात येणार्‍या राष्ट्रपती पोलीस पदकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. १९७९ मध्ये पोलीस महासंचालक (आय.जी.पी.) या पदावरून निवृत्त झाल्यावर गवई यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून करण्यात आली. या पदावर त्यांनी चार वर्षे काम केले. याच काळात त्यांची नियुक्ती राज्य ग्राहक आयोगावर झाली होती. पोलीस सेवेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही गवई कार्यरत होते. दलित समाजाच्या उत्कर्षासाठीही त्यांनी बरेच कार्य केले, तसेच येथे मुस्लीम मुलांसाठी असलेल्या शाळेलाही त्यांनी मदत केली होती. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये राज्यपालांनी नेमलेले प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबईमध्ये वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी मधुकर गवई यांचा मृत्यू झाला.

शिल्पकार चरित्रकोश २०१७