पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क pc FT 1 । 4 प्रशासन खंड काळे, शरद गंगाधर आणि शरद काळे यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘भारतीय संविधान सभे’च्या पार्लमेंटरी डिबेटचा अक्षरश: मुळातून अभ्यास करावा लागला, पण त्यामुळे निर्णय घेताना परिपक्वता येत गेली.” सुमारे सात वर्षे केंद्रात काम केल्यानंतर १९८१ ते ८३ या काळात शरद काळे महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी रुजू झाले. तेथील उत्कृष्ट कामामुळे १९८३ मध्ये त्यांची ‘सहकार सचिव’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि महाराष्ट्राच्या सहकारविषयक प्रश्नांवर उपाययोजना करणारे सुसूत्रीकरण करणारे निर्णय पाहून १९८३ ते १९८६ या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. भारतीय प्रशासकीय सेवेतील या योगदानामुळे शरद काळे यांच्या आयुष्यात आणखी एक मोलाची संधी १९८९मध्ये आली. जगभरातील उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकार्‍यांसह एकत्र अभ्यास करण्याची आणि शोधनिबंध सादर करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठ या अमेरिकेमधील अग्रगण्य विद्यापीठाच्या पाठ्यवृत्तीसाठी काळे यांची निवड झाली. बर्लिनची भिंत कोसळणे, सोव्हिएत संघराज्याचे विभाजन, चीनच्या तिआनामेन चौकातील हत्याकांड अशा नाट्यमय घटनांनी भरलेल्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगभरातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह झालेला अभ्यास आपल्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉइंट’ असल्याचे शरद काळे आजही आवर्जून नमूद करतात. या वर्षभरामध्ये आग्नेय आशियातील राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास, स्टीफन गोल्ड या अग्रगण्य अभ्यासकाकडून ‘पॅलेंटोलॉजी’ अभ्यास, कॅनडा, युरोपियन युनियन अशा देशांना भेटीचा योग, भारतातील जेमिनी ऋषींनी लिहिलेल्या ‘मीमांसा’ या ग्रंथाचे जर्मन शिक्षकांकडून विवेचन असा विविधांगी अभ्यास वयाच्या पन्नासाव्या वर्षी काळे यांनी उत्साहाने आणि परिपूर्णपणे केला. न्यायशास्त्र, लष्करी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ अशा अनेक व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांनी ‘भारतातील आजारी उद्योग’ अर्थात ‘सिक इंडस्ट्रीज’वर आपला शोधनिबंध सादर केला. ऐन जागतिकीकरणात ते महाराष्ट्राच्या योजना विभागाचे सचिव म्हणून १९९१ मध्ये रुजू झाले. या काळात खासगीकरणाची दिशा आणि धोरण ठरविणारे ‘खासगी क्षेत्राचे सहकारी राजपत्र’ (जी.आर.) त्यांनी तयार केले. यानंतरही १९९१ ते १९९५ या काळात मुंबई महापालिकेचे आयुक्त, १९९५ ते १९९६ या काळात पुन्हा एकदा ते महाराष्ट्राच्या योजना विभागाचे सचिव झाले. नंतर १९९६ ते १९९७ मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, १९९९ ते २००१ या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या नोकरभरती विभागाचे अध्यक्ष, आणि सर्वांत शेवटी लोकायुक्त अशी विविध पदे त्यांनी भूषविली. १९९८ पासून मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सरचिटणीस या पदावर ते आजही सक्रिय आहेत. या प्रतिष्ठानातर्फे विविध जनोपयोगी प्रकल्प राबवण्यात, व्याख्यानांचे आयोजन करण्यात ते पुढाकार घेतात. आपल्या प्रशासकीय गुणांबरोबरच शास्त्रीय संगीताविषयीचे प्रेम महाविद्यालयीन जीवनात त्यांनी तबला शिकून टिकवून ठेवले. आईकडून आलेला बॅडमिंटनचा वारसा त्यांनी जपला. क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या खेळांत त्यांनी शाळेचे आणि महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले होते. - स्वरूप पंडित

- स्वरूप पंडित शिल्पकार चरित्रकोश