पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क प्रशासन खंड कानेटकर, विष्णू गोपाळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. १९७०मध्ये त्यांना पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच १९७९मध्ये त्यांना पोलीस सेवेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आले. १९६२ च्या चीन युद्धात विशेष राखीव पोलीस दलाचेे नेतृत्त्व केल्याबद्दल पश्चिम स्टार, संग्राम पदक आणि स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त पदक देऊन त्यांना गौरवण्यात आले. पोलीस सेवेतील मोहन कात्रे यांचे महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे १९८२ साली त्यांनी विशेष राखीव पोलीस दलाने केलेल्या संपाच्या काळातील परिस्थिती कौशल्याने हाताळली. १९८९ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाचे महासंचालक (डायरेक्टर जनरल) या पदावरून मोहन कात्रे निवृत्त झाले. १९८९मध्ये निवृत्त झाल्यानंतर कात्रे पुणे येथे स्थायिक झाले. त्यांनी विविध सामाजिक आणि न्यायविषक (सामान्य माणसाला जलद न्याय मिळवून देण्याच्या) उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. मोहन कात्रे यांनी गुन्हे विषयक तपासामध्ये न्यायदानामध्ये होणारा विलंब टाळता यावा, यासाठी मार्गदर्शन करणार्‍या विचार गटाची स्थापना केली. यामध्ये त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे पहिले आय.जी.पी. व्ही.जी. कानेटकर, ‘रॉ’चे निवृत्त संचालक कर्णिक, गुप्तवार्ता विभागाचे (आय.बी.) निवृत्त संचालक व्ही.जी.वैद्य यांनी सहभाग घेतला. गुन्हे विषयक तपास आणि न्यायदान प्रक्रियेच्या सुधारणेसाठी मार्गदर्शक अशा पुस्तिकेचे प्रकाशन त्यांनी केले. नागरिक चेतना मंच या पुणे येथील विविध सामाजिक, आणि कायदा सुव्यवस्थेविषयक जागृती निर्माण करणार्‍या संस्थेमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. १९९०च्या प्रारंभी ‘सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड’च्या प्रारंभीच्या प्रयत्नामध्ये आणि या संस्थेचा स्थापनेमध्ये डॉ.शां.ब.मुझुमदारांसोबत कात्रे यांचादेखील सहभाग होता. पुणे येथील इंडियन लॉ सोसायटीशी ते सलग्न होते. १९९९ साली कात्रे यांचे वडील गणेश कात्रे यांच्या १०० व्या जयंती निमित्त कात्रे परिवाराने या संस्थेला सहा लाख रुपयांची देणगी दिली. या देणगीमधून दर वर्षी गुन्हे न्यायदान व संबंधित घटकांबाबत अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मोहन कात्रे यांचे १९मार्च२००३ या दिवशी निधन झाले. - संध्या लिमये

कानेटकर, विष्णू गोपाळ महासंचालक, केंद्रीय राखीव पोलीस दल १५ सप्टेंबर १९११ - १२ एप्रिल २००८ विष्णू गोपाळ कानेटकरांचा जन्म सोलापूर येथे झाला. हरिभाई आणि देवकरण शाळेत शालेय शिक्षण संपवून फर्गसन महाविद्यालयामधून त्यांनी बी.एस्सी. पदवी घेतली. १९३४मध्ये आय.पी. म्हणजे त्या वेळची इम्पिरियल पोलीस ह्या परीक्षेत गणित विषयात सर्वोच्च गुण मिळवून ते पहिले आले व पोलीस खात्यात रुजू झाले. सौराष्ट्र व राजस्थानातील गुंड व दरोडेखोरांच्या टोळ्यांचा नि:पात करून तेथे त्यांनी सुव्यवस्था निर्माण केली, हा त्यांच्या कारकिर्दीचा मानबिंदू ठरावा. १९४९मध्ये पुण्याचे डी.एस.पी. म्हणून काम करत असताना सौराष्ट्रात भूपत नामक दरोडेखोराने धुमाकूळ घातला होता. भूपतने जवळपास ऐंशी लोकांचा बळी शिल्पकार चरित्रकोश १८५