पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून चरित्र लेखनासाठी आवश्यक माहितीचे संकलन करणे शक्य झाले. या माहितीचे वर्गीकरण करून लेखकांना ही माहिती चरित्रलेखनासाठी देण्यात आली. या सर्व व्यक्तींशी संपर्क साधताना निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्री. शरद काळे, श्री. श्रीधर जोशी, श्री. प्रभाकर करंदीकर, लीना मेहेंदळे, निवृत्त वन अधिकारी श्री. प्रभाकर कुकडोलकर, अभियांत्रिकी सेवेतील निवृत्त ज्येष्ठ अधिकारी श्री. माधवराव चितळे, श्री. माधव गोविंद पाध्ये, श्री. विद्यानंद रानडे, भारतीय रेल्वे सेवेतील अधिकारी श्री. विजयकुमार राणे यांनी वेळोवेळी सहकार्य केले त्यामुळेच सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. या सर्वांची मी ऋणी आहे. | या सर्व प्रक्रियेमध्ये काही प्रशासकीय अधिका-यांची पुरेशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला न्याय मिळेल अशा प्रकारे त्यांचे चरित्रखंडात देण्यात आलेले नाही. याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, तसेच काही चरित्रनायकांची माहिती वेळेत उपलब्ध होऊ शकली नाही अशा व्यक्तींची चरित्रे आम्ही घेऊ शकलो नाही. प्रशासन या विषयाचा एकूण विस्तार लक्षात घेता यात काही त्रुटी राहणे शक्य आहे. वाचक त्याबद्दल उदार अंत:करणाने क्षमा करतील असा विश्वास आहे. - संध्या सुधाकर लिमये खंड समन्वयक १४४ शिल्पकार चरित्रकोश