पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनोगत साप्ताहिक विवेकने हाती घेतलेल्या आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश प्रकल्पातील प्रशासन खंड प्रकाशित होत आहे. याबरोबरच न्यायपालिका आणि संरक्षण हे खंड देखील प्रकाशित होत आहेत.प्रशासन खंडासाठी समन्वयक आणि संकलक म्हणून जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रशासकीय विकासाला चालना देणा-या व्यक्तींचा परिचय या खंडाच्या माध्यमातून करून देण्यात आला आहे. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय रेल्वे सेवा, भारतीय आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, भारतीय वन सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा या विभागामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाच्या अधिका-यांच्या १०७ नावांचा समावेश करण्यात आला आहे. प्रशासन खंडाचे निकष, कार्यक्षेत्र आणि समाविष्ट करावयाची नावे या बाबी निश्चित करण्याच्या दृष्टीने दि.२७ मार्च २०१० रोजी इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स, पुणे येथील सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी श्री.शरद काळे, श्री.माधवराव चितळे, न्या.श्री.नरेंद्र चपळगावकर,श्री.नितीन केळकर,श्री.लक्ष्मीकांत देशमुख, सौ.वैजयंती जोशी,श्री.दादासाहेब बेंद्रे ,प्रकल्पाचे प्रबंध संपादक श्री.दिलीप करंबेळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला या मान्यवरांसमोर ढोबळमानाने तयार करण्यात आलेली प्रशासकीय अधिका-यांची यादी ठेवण्यात आली. या यादीवर चर्चा होऊन काही बदल सुचविण्यात आले. यावेळी प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या, महाराष्ट्राच्या देशाच्या प्रशासनाला दिशा देणारे मूलभूत बदल घडवून आणणाच्या,अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणणाच्या प्रशासकीय अधिका-यांच्याच नावांचा समावेश सदर खंडात करण्यात यावा असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीनंतर या खंडाच्या कामास दिशा मिळून यादी निश्चितीचे कामास सुरुवात झाली. प्रशासनातील चरित्रनायकांची यादी निश्चित करण्यासाठी मी प्रशासनातील तज्ज्ञ मान्यवरांच्या भेटी घेतल्या. तसेच पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ग्रंथालय, मंत्रालयातील भारतीय लोकप्रशासन विभागीय संस्थेचे ग्रंथालय, पुणे येथील वनविभागाचे ग्रंथालय, दैनिक सकाळ संदर्भ ग्रंथालय यांना भेट देऊन तेथील भारतीय प्रशासन या विभागातील ग्रंथांमधून माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. या कामामध्ये भारतीय लोक प्रशासन विभागीय संस्थेचे कार्यकारी सहसचिव श्री. शांताराम निलकंठ कुलकर्णी, यशदाचे संशोधन अधिकारी श्री.बबन जोगदंड, पुणे येथील वनविभागाचे ग्रंथालयाचे उपग्रंथपाल श्री.शेनिटकर, दैनिक सकाळ संदर्भ ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्री गाडेकर यांचे सहकार्य लाभले. या ग्रंथालयांमध्ये काही प्रशासकीय अधिका-यांची चरित्रे, आत्मचरित्रे, लेख उपलब्ध होऊ शकले. परंतु प्रशासनाच्या सर्व क्षेत्रांचा विचार करता ही माहिती पुरेशी नव्हती. | त्यानंतर मी प्रशासन खंडामधे समाविष्ट करण्यात आलेले चरित्रनायक, त्यांचे स्नेही, त्यांच्या प्रशासकीय कामगिरी माहिती असणारे प्रशासनातले अधिकारी, दिवंगत अधिका-याचे स्नेही आणि नातेवाईक यांच्याशी शिल्पकार चरित्रकोश १४३