पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिदायतुल्ला, मोहम्मद न्यायपालिका खंड दांडगा होता. उर्दू कविता किंवा शायरीचीही त्यांना आवड होती. आजही त्यांची निकालपत्रे, पुस्तके वा भाषणे वाचताना या सर्व गोष्टींचा प्रत्यय येतो. राज्यसभेचे अध्यक्षपदी कामकाज चालविताना त्यांच्या हजरजबाबीपणाचा व विनोदबुद्धीचा प्रत्यय येई. न्या.हिदायतुल्ला यांनी अनेक पुस्तके लिहिली. ‘डेमॉक्रसी इन इंडिया अँड द ज्युडिशिअल प्रोसेस’, ‘ज्युडिशिअल मेथड्स’, ‘यू.एस.ए.अँडइंडिया’ व ‘द फिफ्थ अँड सिक्स्थ शेड्युल्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’ ही त्यांपैकी प्रमुख होत. त्यांनी देशात व परदेशात वेळोवेळी दिलेल्या भाषणांचे व संकीर्ण लेखांचे संग्रह ‘ए जजेस् मिसलेनि’ या शीर्षकाने चार खंडांमध्ये प्रसिद्ध झाले. याशिवाय मुस्लीम कायद्यावरील ‘मुल्लाज् मोमेडिअन लॉ’ या प्रमाणभूत ग्रंथाच्या अनेक आवृत्त्यांचे त्यांनी अत्यंत साक्षेपाने संपादन केले. १९८० मध्ये प्रकाशित झालेले ‘माय ओन बॉस्वेल’ हे त्यांचे आत्मचरित्र हे अत्यंत वाचनीय असून हे लेखन संयत, संतुलित व डौलदार लेखनाचा वास्तुपाठ आहे. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. हिदायतुल्ला, मोहम्मद; “माय ओन बॉस्वेल” (आत्मचरित्र); आर्नल्ड हाइनमन; १९८०.

हे १३४ शिल्पकार चरित्रकोश