पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोराबजी, सोली जहांगीर न्यायपालिका खंड २००६ ते हेग येथील ‘पर्मनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन’चे सदस्य होते. शिवाय ‘युनायटेड लॉयर्स असोसिएशन’चे व ‘इंटरनॅशनल बार असोसिएशन’च्या मानवी हक्क समितीचे ते उपाध्यक्ष आहेत. घटनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी १९९९मध्ये नेमण्यात आलेल्या वेंकटाचलय्या आयोगाचे ते सदस्य होते. नंतर भारतातील पोलिस प्रशासनात आणि १८६१ च्या पोलिस कायद्यात सुधारणा सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे सोराबजी अध्यक्ष होते. या समितीने २००६ मध्ये आपला अहवाल सरकारला सादर केला. सोराबजी यांचे इंग्रजीवर प्रभुत्व असून ते सातत्याने लेखन करीत असतात. ‘लॉ ऑफ प्रेस सेन्सॉरशिप इन इंडिया’ आणि ‘दि इमर्जन्सी, सेन्सॉरशिप अ‍ॅन्ड दि प्रेस इन इंडिया : १९७५-१९७७’ ही त्यांची महत्त्वाची पुस्तके पूर्वी प्रसिद्ध झाली, तर ‘लॉ अ‍ॅण्ड जस्टिस’ हे पुस्तक अलीकडे म्हणजे २००४ मध्ये प्रसिद्ध झाले. अन्य विविध महत्त्वाच्या पुस्तकांतही त्यांचे निबंध समाविष्ट झालेले आहेत. कायदेविषयक नियतकालिकांत तसेच वृत्तपत्रांतही त्यांचे लेखन नियमित सुरू असते. कायदा आणि न्यायविषयक वेगवेगळ्या विषयांवर सोराबजींनी अनेक व्याख्याने दिली आहेत. भारत सरकारने २००२ मध्ये पद्मविभूषण हा सन्मान देऊन सोराबजींचा गौरव केला. त्यांना इंग्रजी साहित्याची तसेच अभिजात आणि जॅझ या दोन्ही प्रकारच्या पाश्चात्त्य संगीताची अतिशय आवड आहे. सोराबजी यांचे वास्तव्य नवी दिल्ली येथे आहे. - शरच्चंद्र पानसे

१३० शिल्पकार चरित्रकोश