पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ए ऐ ओ औ (-) अनुस्वार (:) विसर्ग क ख ग घ ङ त थ प फ द ध न ब भ म | ष स । कोशात ‘अ-ओ' असा स्वरांचा एक विभाग केलेला आहे व पुढे क, ख, ग... असे व्यंजनानुसार विभाग केलेले आहेत. ज्या अक्षराखाली एकही नोंद नाही, ते अक्षर वगळले आहे. वाचकांच्या सोयीसाठी कोशात अनुक्रमणिकेचाही अंतर्भाव केलेला आहे. | अनुक्रमणिका तिन्ही खंडांची अनुक्रमणिकेची रचना ढोबळ मानाने पुढीलप्रमाणे आहे. यात चरित्रनोंदीला अनुक्रमांक न देता पहिल्या स्तंभात चरित्रनायकाचे नाव दिले आहे. या नावाच्या आधी मुख्य चरित्रनोंदीसाठी '०', नामोल्लेख नोंदीसाठी '०', टिपणनोंदीसाठी 'A'अशा खुणा देण्यात आलेल्या आहेत.चरित्रनायकाच्या नावानंतरच्या स्तंभात चे पटुक्रमांक दिलेले आहेत. या अनक्रमणिकेतील शेवटचा स्तंभ मुख्य नोंद' असा आहे. पृष्ठक्रमांकावर जर नामोल्लेख नोंद असेल व त्या चरित्रनायकाची मुख्य नोंद याच खंडात जेथे असेल तो पृष्ठक्रमांक या स्तंभात दर्शविलेला आहे व त्या चरित्रनायकाची मुख्य नोंद अन्य खंडात असेल तर त्या विशिष्ट खंडाचे नाव या स्तंभात दर्शविले आहे. | वेगवेगळ्या खंडांच्या अनुक्रमणिकेत खंडातील चरित्रनायकांचा परिचय घडून देण्याच्या दृष्टीने त्याने भूषविलेले पद, त्याचे विशिष्ट कार्यक्षेत्र, त्याचे सेवाक्षेत्र याचा समावेश केलेला आहे. कोशाबरोबर अनुक्रमणिकेची ही रचनाही वाचकांना उपयोगी ठरेल, असा विश्वास आहे. | - दीपक हनुमंत जेवणे | प्रकल्प कार्यकारी संपादक १२ / न्यायपालिका खंड शिल्पकार चरित्रकोश