पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रानडे, महादेव गोविंद न्यायपालिका खंड मुद्देसूद असत. या कार्यपद्धतीमुळे त्यांच्याबद्दल सार्वत्रिक आदराची भावना होती. न्या.रांगणेकर विनयशील, मृदुभाषी, त्याचबरोबर अतिशय मिस्किल व हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध होते. ते निर्भीड व स्पष्टवक्तेही होते. त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९३८.

रानडे, महादेव गोविंद मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश १८ जानेवारी १८४२ - १६ जानेवारी १९०१ ऋ मुख्य नोंद - राजकारण खंड आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या प्रक्रियेत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सिंहाचा वाटा उचलणारे, मुंबई उच्च न्यायालयाचे तिसरे कायम भारतीय न्यायाधीश, चतुरस्र कर्तृत्वाचे महादेव गोविंद रानडे ऊर्फ माधवराव रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झाला. त्यांचे वडील गोविंदराव हे तेथे सरकारी नोकरीत होते. नंतर ते कोल्हापूर संस्थानात गेले आणि तेथे खाजगी कारभारीपदापर्यंत चढले. त्यामुळे १८५६ पर्यंत माधवरावांचे शालेय शिक्षण कोल्हापूरला झाले. त्यानंतर वडिलांनी त्यांना मुंबईला पाठविले. मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून माधवराव १८५९ मध्ये मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले आणि तेथून १८६२ मध्ये बी.ए. ची परीक्षा दुसर्‍या वर्गात उत्तीर्ण झाले. ती मुंबई विद्यापीठाने घेतलेली पहिली बी.ए. परीक्षा होती. तिच्यात जे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांच्यापैकी रानडे हे एक होत. (बाकीचे तिघे म्हणजे सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक हे होत.) रानडे बी.ए. झाल्यावर लगेचच ‘इंदुप्रकाश’ साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांची नेमणूक झाली. नंतर १८६४ मध्ये त्यांनी एम.ए. पदवी प्राप्त केली व लगेच मुंबई विद्यापीठाचे फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर १८६६ मध्ये ते एलएल.बी. ची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एलएल.बी. झाल्यानंतर रानड्यांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला. १८६६ ते १८९१ या काळात त्यांना ओरीएंटल ट्रान्सलेटर, अक्कलकोट संस्थानाचे कारभारी, कोल्हापूर संस्थानात न्यायाधीश, एल्फिन्स्टन महाविद्यालयात इंग्रजी आणि इतिहास या विषयांचे प्राध्यापक, स्मॉलकॉज कोर्टात न्यायाधीश, पोलीस मॅजिस्ट्रेट, उच्च न्यायालयात आधी सहायक आणि मग उप-रजिस्ट्रार, अशा विविध नेमणुका कमी -अधिक अवधीसाठी मिळाल्या. १८७१ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाची अ‍ॅडव्होकेटची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर कायम न्यायखात्यात राहिले. अ‍ॅडव्होकेट म्हणून उच्च न्यायालयात नोंदणी केल्यानंतरही त्यांनी कधी वकिली केली नाही. त्यांची पहिली नेमणूक पुण्याला कनिष्ठ न्यायाधीश (सबॉर्डिनेट जज्) म्हणून झाली. त्यांचे काम पाहिल्यानंतर सरकारने त्यांना अपिले ऐकून त्यांवर निर्णय देण्याचेही अधिकार दिले. असे अधिकार मिळालेले ते पहिले कनिष्ठ न्यायाधीश होते. पाच वर्षांनंतर त्यांची पुण्याहून नाशिकला बदली करण्यात आली. १८७९ मध्ये त्यांची धुळ्याला बदली झाली. त्यानंतर १८८१ मध्ये त्यांची बदली मुंबईला इलाखा दंडाधिकारी (प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट) म्हणून झाली. तोपर्यंत त्यांनी दिवाणी दाव्यांचेच काम केले होते; आता ते फौजदारी खटल्यांचे काम पाहू लागले. नंतर १८८४ मध्ये त्यांची पुन्हा पुण्याला बदली झाली आणि ते पुण्याच्या स्मॉलकॉज कोर्टाचे न्यायाधीश झाले. १८८५ मध्ये मुंबईच्या गव्हर्नरच्या शिल्पकार चरित्रकोश