पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड मॅकॉले, टॉमस बॅबिंग्टन यांची कलकत्ता विद्यापीठात ‘टागोर विधि अधिव्याख्याता’ (टागोर लॉ लेक्चरर) म्हणून नियुक्ती झाली. १९२८ मध्येच त्यांची नियुक्ती व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळाचे कायदेविषयक सदस्य म्हणून झाली. या दोन्ही पदांवर मुंबई इलाख्यातील व्यक्तीची नियुक्ती होण्याची ती पहिलीच वेळ होती. १८८२ च्या ‘संपत्ती हस्तांतरण कायद्या’मध्ये महत्त्वाच्या दुरुस्त्या करणारे विधेयक मुल्ला यांनी या काळात तयार केले. १९२९ मध्ये त्याचे कायद्यात रूपांतर झाले. १९३० मध्ये मुल्ला यांची नियुक्ती प्रिव्ही काउन्सिलच्या न्यायालयीन समितीचे सदस्य म्हणून झाली. हा मान मिळालेले ते चौथे भारतीय होत. (त्यापूर्वी सय्यद अमीर अली, लॉर्ड सिन्हा आणि सर विनोद मित्तर प्रिव्ही काउन्सिलचे सदस्य झाले होते.) या पदावर ते दोन वर्षे होते. १९३० मध्येच त्यांना ‘सर’ हा किताब मिळाला. या दोन वर्षांच्या काळात प्रिव्ही काउन्सिलने हिंदू कायद्यासंबंधीच्या अनेक गुंतागुंतीच्या खटल्यांत महत्त्वाचे निर्णय दिले. दोन वर्षांनी मुल्ला यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. तथापि कायद्याच्या क्षेत्रात सर दिनशा यांचे नाव सर्वतोमुखी झाले, आजही आहे आणि यापुढेही राहील, ते म्हणजे त्यांनी अनेक महत्त्वाच्या कायद्यांवर लिहिलेल्या प्रमाणभूत ग्रंथांमुळे. ‘कोड ऑफ सिव्हिल प्रोसीजर’, ‘इंडियन कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅक्ट’, ‘इंडियन रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट’, ‘ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी अ‍ॅक्ट’ त्याचप्रमाणे हिंदू कायदा व मुस्लिम कायदा यावरील मुल्लांचे जाडजूड, पण सुगम आणि सुबोध विवेचन करणारे ग्रंथ दशकानुदशके वकील व न्यायाधीश या दोघांसाठी अपरिहार्य बनले आहेत. त्यांच्या नव्या सुधारित आवृत्त्या नियमितपणे प्रकाशित होतात. या ग्रंथांमुळे सर दिनशा यांना श्रेष्ठ वकिलाप्रमाणेच श्रेष्ठ न्यायविद म्हणून मान्यता मिळाली. १९३१ मध्ये मुंबई विद्यापीठाने सर दिनशा यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ ही सन्मानार्थ पदवी दिली. त्यानंतर काही काळाने लिंकन्स इन्ने ‘ऑनररी बेंचर’ म्हणून त्यांची निवड केली. सर दिनशा हे अतिशय सुसंस्कृत, शालीन आणि मनमिळाऊ होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वत:ची बुद्धी, ज्ञान आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी कायद्याच्या क्षेत्रातली बहुतेक सगळी अत्युच्च शिखरे पादाक्रान्त केली. - शरच्चंद्र पानसे

मेकॉले, टॉमस बॅबिंग्टन ‘इंडियन पीनल कोड’ चा जनक २५ ऑगस्ट १८०० - २८ डिसेंबर १८५९ लॉर्ड मेकॉले या नावाने भारतात सर्वांना परिचित असलेला टॉमस बॅबिंग्टन मेकॉले हा एक प्रख्यात इंग्रज इतिहासकार, लेखक आणि राजकीय नेता होता. इंग्लंडमधील लायसेस्टरशायर परगण्यातील रॉथली टेम्पल येथे त्याचा जन्म झाला. अगदी लहानपणापासूनच त्याला लेखनाचे वेडही होते आणि अंगही होते. त्याचे शालेय शिक्षण एका खासगी शाळेत झाले. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर १८२६ मध्ये तो बॅरिस्टर झाला. परंतु वकिलीत त्याचे मन रमले नाही. लेखन आणि राजकारण यांची त्याला आवड होती. १८३० मध्ये तो हाउस ऑफ कॉमन्समध्ये प्रथम निवडून आला. तो ब्रिटनमधील राजकीय सुधारणांचा प्रारंभकाळ होता. १८३३ च्या भारतासंबंधीच्या विधेयकावर मेकॉलेने महत्त्वाचे भाषण केले. त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यात मेकॉलेचा महत्त्वाचा वाटा होता. योगायोगाने या कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या सुप्रीम काउन्सिलचा सदस्य म्हणून मेकॉलेची नियुक्ती झाली आणि १८३४ मध्ये तो म । शिल्पकार चरित्रकोश १०७