पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ६ - दृश्यकला.pdf/८१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्योत्स्ना पाठारे, जी. डी. आर्ट, ए. एम. ( फाईन आर्ट्स), एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट येथून प्राचार्य म्हणून निवृत्त, मुंबईसह समूह व एकल प्रदर्शने झाली आहेत. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे रजतपदक प्राप्त झाले.

श्रीकांत कशेळकर, जी. डी. आर्ट पदविका प्राप्त केली. कमर्शियल आर्टिस्ट, ए.बी. ॲण्ड पाल या फर्ममध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केले. मुक्त पत्रकार म्हणून कलाविषयक लेखन करीत आहेत.

राहुल देशपांडे, हे कौशल्यपूर्ण चित्रनिर्मितीसोबतच लेखन करणारे पुण्यातील कलावंत असून आकर्षक रंगसंगती व उत्तम आरेखन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.

शिवाजी तुपे, आयुष्यभर निसर्गचित्रणाचा व्यासंग केलेले शिवाजी तुपे नाशिक येथे अनेक कलाविषयक उपक्रमांत सहभागी असतात. त्यांची निसर्गचित्रविषयक पुस्तके प्रसिद्ध व निसर्गचित्रांची प्रदर्शने झाली आहेत.

प्रकाश राजेशिर्के, कोकणातील सावर्डे येथील कला महाविद्यालय येथून प्राचार्य म्हणून निवृत्त. कोकणातील अनेक कलाविषयक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. ते कलाविषयक लेखन करतात.

अस्मिता जगताप, जी.डी. आर्ट, ए.एम. ( फाईन आर्ट्स) कोल्हापुरातील दळवी आर्ट इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य म्हणून काम केले. त्यांची अनेक प्रदर्शने झाली असून चित्र-शिल्पकलेवर लेखन केले आहे.

प्रभाकर दिवाकर, हे नाट्यछटाकार दिवाकर यांच्या कुटुंबातील असून विविध कलांमध्ये रस असणारे व्यक्तिमत्त्व आहे. वाई येथील विश्वकोश निर्मितीत त्यांचा सहभाग होता. कलाविषयक लेखन करतात.


शिल्पकार चरित्रकोश