पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड मत्स्योद्योग मत्स्योद्योग या विषयात सागरी, मचूळ पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारी आणि मत्स्यसंवर्धनाचा समावेश होतो. मासेमारीचा व्यवसाय अनादिकालापासून जगात सर्वत्र अस्तित्वात आहे. या व्यवसायावर कोट्यावधी लोकांची उपजीविका अवलंबून आहे. भौगोलिक व जलानुषंगिक परिस्थितीनुसार विशिष्ट ठिकाणी ठरावीक जातीचे जलचर उत्पन्न झाले आहेत. शिकारीचे तंत्र ज्ञात झाल्यावर मानवाने या जलचरांचा समावेश आपल्या आहारात केला. या जलचरांमध्ये माशांच्या विविध जातींबरोबर खेकडे, कोळंबी, शेवंड, शिंपले, कालवे अशा प्राण्यांचा आणि अनेक प्रकारच्या जलवनस्पतींचा समावेश होतो. मासेमारीच्या व्यवसायात काही लोक सधन असले तरी बहुसंख्य मत्स्यकार मध्यम स्थितीतील वा आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील आहेत. १) इतिहास : मासेमारी हा मानवाचा पुरातन काळापासून चालत आलेला उपजीविकेचा व्यवसाय व छंद आहे. आदिमानवाने प्राण्यांसाठी अवगत केलेले शिकारीचे तंत्र जलचरांच्या शिकारीसाठी वापरले असावे. मासे पकडण्यासाठी भाल्याने अथवा धनुष्यबाणाने मासे मारणे, गळाला आमिष लावून मासे पकडणे, जाळे टाकून मासे पकडणे; तसेच विषारी वनस्पती पाण्यात टाकून माशांना गुंगी आणून त्यांना पकडणे, अशा अनेक प्रकारे मानवाने माशांची शिकार करण्याच्या पद्धती माशांच्या सवयींची पाहाणी करून विकसित केल्या आहेत. नौकानयनाचे तंत्रज्ञान अवगत झाल्यावर मासेमारीचा आवाका वाढला व त्यास बळकटी आली. इ.स. पूर्व काळातील सुमेरीयन आणि इजिप्तशीयन प्राचीन शीला चित्रांवरून पुरातन काळापासून मासेमारीचा व्यवसाय मानव करत असल्याचे दिसते. भारतात सुमारे ४००० वर्षांपूर्वीच्या काळात मासेमारीचा व्यवसाय अस्तित्वात होता असे सिंधु खोऱ्यातील मोहेंजोदडो येथील उत्खननात आढळले आहे. त्यात मासेमारीचे मचवे, बंदरातील मासळी उतरवण्याच्या जागा आदिंचे अवशेष प्रामुख्याने दिसतात. तसेच भाजलेल्या तांबड्या मातीच्या भांड्यावर महसीरसारख्या माशांची व ते पकडण्यासाठी वापरलेल्या गळांची चित्रेही आढळतात. नंतरच्या म्हणजे आर्य चाणक्याच्या काळात (इ. स. पूर्व चार शतके) मासळीच्या शिल्पकार चरित्रकोश उत्पन्नाचा १/६ भाग सरकारने तलावाची भाडेपट्टी म्हणून घ्यावा व मासळीच्या उत्पन्नावरील जकातीचा दर माफक असावा, तसेच सुकवलेल्या मासळीचा उपयोग सैन्यातील जवानांसाठी कसा करावा याचे विवरण त्याच्या 'अर्थशास्त्र' या ग्रंथात नमूद केले आहे. दुष्काळी परिस्थितीत राजे-रजवाडे व त्याच्या सहचरांनी नदी, तलाव व समुद्रकिनारी जाऊन मासेमारी करून प्रजाजनांना अन्न पुरवण्याचा प्रयत्न करावा अशाही सूचना कौटिल्याच्या अर्थनीतीमध्ये आहेत. भारतात फार प्राचीन काळापासून मत्स्योत्पादन, त्यावरील प्रक्रिया व त्यांची विक्री या गोष्टी ग्रामीण व्यवसाय म्हणून केल्या जात असत हे यावरून स्पष्ट व्हावे. पोर्तुगीजांच्या १५५४ च्या एका पत्रात कराची ते मुंबईच्या समुद्रात खोलवर पुरलेल्या परंतु पृष्ठभागावर दिसणाऱ्या अ खांबांचा उल्लेख आहे. हे खांब ४० मीटर उंचीचे असून त्यास जाळ्याची दोरी बांधून मासेमार मासळी पकडत असत याचे पोर्तुगीजांना अप्रुप वाटले. ही 'डोळ' या प्रकारची जाळी अजूनही वापरात आहेत व मासेमारी करण्याच्या तंत्रातील अत्यंत प्रभावी पद्धत म्हणून जगन्मान्य आहे (चि.क्र. १५६ ) . २) व्यवस्थापन : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १६८४ह्नसाली मुंबई प्रांतातील मासेमारांकडून प्रति मचवा रु. १ असा कर आकारण्याचे सुचवले होते. पुढे १७६६ह्नमध्ये असा कर घेऊ नये, उलट त्यांना सवलती द्याव्यात अशी शिफारस केली. संपूर्ण भारताच्या जलसमृद्धी व जलसंपत्तीच्या अभ्यासाचे श्रेय ब्रिटिशांना जाते. सर फ्रान्सीस डे यांचा 'द फिशेस ऑफ इंडिया' हा प्रख्यात ग्रंथ १८७८साली प्रसिद्ध झाला व मत्स्यशास्त्रातील आधारभूत ग्रंथ म्हणून आजही वापरला जातो. याच सुमारास सर हेन्री कॉटन यांनी माशांच्या स्थलांतरांचा अभ्यास करून नदीवर बंधारे बांधल्याने माशांच्या नैसर्गिक स्थलांतरात अडथळे येतात व त्यांच्या पुनरुत्पादनास बाधा येते, त्यामुळे बंधारे बांधताना त्यात 'मत्स्य सोपान' बांधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादित केले. या सर्व लेखनामुळे या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले व १८९७ साली पहिला 'भारतीय मत्स्योद्योग कायदा' संमत झाला. मत्स्योद्योगाच्या व्यवस्थापनासाठी तत्कालीन मद्रास इलाख्यात पहिले स्वतंत्र मत्स्योद्योग खाते मद्रास (आजचे २०९