पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यात असे दिसून आले की बाजरीचे सरासरीने (५ वर्षांची) ६ क्टिंटल हेक्टरी धान्य मिळाले व लाकूड ४८ टन मिळाले (५ व्या वर्षी). नुसत्या बाजरीच्या पिकावर ही वाढ १३०% दिसून आली. जेथे दोन ओळीत तूर घेतली होती. तेथे तुरीचे (५ वर्षीची सरासरी) ३.६ क्टिंटल उत्पन्न तर लाकडाचे (सुबाभूळ) ४७ टन उत्पन्न मिळाले (५ह्नव्या वर्षी) मात्र एकूण उत्पन्न हे पूर्ण पिकाच्या ९०% एवढेच होते. २. विस्तार वनविज्ञान : यात (अ) शेतावरील पिकांचे व तेथील मातीचे तसेच सोसाट्याच्या वाऱ्यापासून रक्षण व्हावे यासाठी झाडांच्या रांगा लावून संरक्षक पट्टे निर्माण करणे व त्याचे व्यवस्थापन करणे. (ब) गावातील सामायिक जमिनींवर गवत, बांबू वगैरे झाडे लावून त्यांचे व्यवस्थापन (क) कालवे, लोहमार्ग वाहतुकीचे रस्ते यांच्या दुतर्फा झाडे लावणे (ड) शहरी भागात कारखाने, शिक्षण संस्था, क्रीडांगणे इत्यादींच्या आवारात झाडे लावून त्यांची जोपासना करणे याचा समावेश होतो. ३. निकृष्ट वनांचे पुनर्वनीकरण : यामध्ये रोगग्रस्त झाडे तोडणे, वाढीला चालना मिळेल अशी झाडाची छाटणी करणे, कृषी खंड विरळ व ओसाड भागात नव्या रोपांची लागवड करून वने सामाजिक उद्दिष्टांसाठी राखणे व विकसित करणे याचा समावेश होतो. ४. मनोरंजन वनविज्ञान रंजनवनिकी : यामध्ये शहरांच्या आसमंतात वृक्षसमुहांची लागवड करून जोपासना करणे, सहलीसाठी वनोद्याने निर्माण करणे. शहरातील मोकळ्या जागांवर सौंदर्यविज्ञान व स्थलशिल्पशास्त्राचा उपयोग करून लागवड करणे; तसेच नगररचनेचा भाग म्हणून हिरव्या पट्टयांचे नियोजन हे अंतर्भूत आहे. लोकसंख्या वाढ, वातावरणातील बदल, वाढते प्रदूषण पर्यायाने पृथ्वीचा विनाश हे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर वनांचे संरक्षण, संवर्धन करणे अनिवार्य आहे याची जाण समाजातील सर्व थरांना होणे आवश्यक आहे. त्यासाठी संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन अभ्यासणे आवश्यक आहे. वनसंरक्षणाविषयीच्या कायद्यांचे कसोशीने पालन करणे अपरिहार्य आहे. अन्यथा विनाश अटळ आहे!

- डॉ. सुजाता तेताली २०८ शिल्पकार चरित्रकोश