पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड लागवडीयोग्य वनस्पतींचे उत्पादन तंत्रज्ञान विकास (खते / पाणी/रोग व कीड नियंत्रण ) तसेच प्रक्रिया तंत्रज्ञान, उत्पादनाचा दर्जा यांचे संशोधन व विकास या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विविध राज्यांमध्ये जे काही संशोधन झाले आहे त्यांचे संकलन करून प्रकाशित करणे गरजेचे आहे. औषधी व सुगंधी वनस्पती बाजारपेठेबाबत माहिती संकलित करून प्रकाशित करणे गरजेचे आहे. काही निवडक केंद्रामध्ये वनस्पतीजन्य द्रव्य संशोधन व विघटन विकास, जैवतंत्रज्ञान आणि औषधी परिणाम (क्षमता) याबाबत संशोधनावर भर देण्याची गरज आहे. आर्थिक दृष्टीने परवडणाऱ्या औषधी व सुगंधी वनस्पतींची नियमित पिकाप्रमाणे लागवड करणे; त्याच बरोबर या वनस्पतींची केंद्रीय पद्धतीने सामुदायिक शेती करणे ही काळाची गरज आहे आणि तेही जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकटीत बसून सर्व नियमांचे पालन करून उत्पादन व त्यांचे व्यवस्थापन करणे भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे.

- • डॉ. प्रदीप नवले शिल्पकार चरित्रकोश २०३