पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साहित्य खंड क्रमांकाने बी.ए. झाल्या. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील बराचसा काळ इरावती बाई त्या वेळचे फर्गसनचे प्राचार्य रँगलर र. पु. उर्फ अप्पासाहेब परांजपे यांच्याकडे राहत होत्या. त्यांच्या घरातील वातावरण सांस्कृतिक पण त्याच वेळी आधुनिक, उच्च दर्जाचे व वाङ्मयीन अभिरुचीला खतपाणी घालणारे होते. काव्य-शास्त्रविनोदाला अत्यंत अनुकूल अशा घरात इरावतींचे लहानपण व तरुणपण गेले. संस्कारक्षम वयात योग्य ती शिस्त लावून वाङ्मयीन अभिरुचीची जाण इरावतींमध्ये निर्माण केली गेली. त्याचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावर झालेला दिसतो. अप्पासाहेबांचे पंजाबी मित्र बाळकराम यांच्यामुळे त्यांना वाचनाचे प्रेम जडले. वडिलांच्या (ज्यांना त्या काका म्हणत) फिरतीच्या नोकरीमुळे फिरण्याची व निरीक्षणाची आवड निर्माण झाली. स्वानुभव गर्भित ललितकथा लालवट गोरा रंग, साडेपाच फूट उंची, धिप्पाड बांधा, निळे चमकदार डोळे, डोळ्यांत हुशारीचे तेज व किंचित किनरा आवाज, कोणालातरी बजावून सांगावे असे बोलणे, चालण्यात चपळपणा व एक प्रकारचा आत्मविश्वास असे इरावर्तीचे लोभनीय रूप होते. आकर्षक व पुरोगामी व्यक्तिमत्त्वाबरोबरच अंगभूत बौद्धिक हुशारी होती. १९२६ साली त्या वेळचे फर्गसन महाविद्यालयामधील प्रो. दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. १९२८ साली मुंबई विद्यापीठातून एम.ए. झाल्यावर पीएच. डी. करायला जर्मनीला जाण्यासाठी त्यांना सासऱ्यांचा पाठिंबा, आशीर्वाद नव्हता. परंतु पीएच. डी. साठी जर्मनीला जाणे निश्चित केले. १९३० साली मानववंशशास्त्रामध्ये A Symmoctry of the human skull 'मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची अरूप प्रमाणता' ह्या विषयावर पूर्ण शिल्पकार चरित्रकोश कर्वे, इरावती दिनकर क केली. जर्मनीहून आल्यानंतर त्यांना कर्वे विद्यापीठाच्या कुलसचिवपदी काम करावे लागले (१९३१ ते १९३९). त्यानंतर १९३९ मध्ये डेक्कन महाविद्यालयामध्ये रुजू होऊन स्वतःला आवडलेली व पटलेली संशोधनाची वाट त्यांनी चोखाळली. डेक्कन महाविद्यालयामध्ये रुजू झाल्यानंतर संशोधनानिमित्त झालेल्या प्रवासातून त्या सर्व भारतभर व जगभर फिरल्यामुळे त्यांची जशी संशोधकीय पुस्तके तयार झाली, तशीच त्यांची 'परिपूर्ती', 'भोवरा' व 'गंगाजळ' ( मृत्यूनंतर प्रसिद्ध ) ही ललित गद्यात्मक पुस्तकेही निर्माण झाली. त्यांच्या बहुतेक लेखांतून ललितरीत्या स्वानुभवच अवतरला. त्यामुळे स्वानुभव गर्भितता ह्या मूलभूत प्रेरणेचा विचार करून ह्या तिन्ही पुस्तकांतील ललितकथांचा विचार एकत्रितपणे करता येतो. इरावतींच्या ललितलेखांचे आस्वादक, चिंतनपर, प्रवासवर्णनपर, व्यक्तिचित्रणात्मक, कविता असे अनेक उपविभाग होऊ शकतात. मात्र हे लेखन अमुक एक प्रकारेच लिहायचे, असे ठरवून झालेले नाही. त्या लिहीत गेल्या व ललित गद्यातल्या अनेक उपप्रकारांना जन्म मिळाला. त्यात मुद्दाम असा सजावटीचा भाग नाही. ललित गद्याच्या संक्रमण अवस्थेत ललितगद्याला नवीन, हवाहवासा आकृतिबंध देणाऱ्या त्या मानाच्या शिलेदार ठरतात. ललितगद्याच्या उगमापाशी इरावती पाय रोवून डौलाने उभ्या आहेत. इरवतींचे नाव मराठीच्या साहित्यविश्वामध्ये सर्वतोमुखी होण्याचे कारण 'परिपूर्ती' हे होय. 'जन्मांतरीची भेट' आणि 'वाटचाल' ह्या लेखांमुळे त्यांची साहित्यिक उंची सर्वांच्या नजरेत भरली. माणसाचा 'माणूस' म्हणून त्या शोध घेत असतात. ह्यापूर्वीही अप्पासाहेब परांजपे यांचे 'दुसरे मामंजी' तसेच महर्षी कर्वे यांचे 'आजोबा' ही व्यक्तिचित्रे अशीच सरस उतरली आहेत. 'युगान्त'ने त्यावर कळस चढविला. इरावतींचे 'अभिरुची' मधील सुरुवातीचे लेखन 'क' ह्या टोपण नावाने होते. ५९