पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कर्वे, इरावती दिनकर क साहित्य खंड भारत सरकारचा 'पद्मश्री' हा पद्मपुरस्कार त्यांनी साली निर्माण झालेले हे महाराष्ट्रातील पहिलेच आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. 'कोमसाप': अभिजात महाकादंबरी १९९० मध्ये रत्नागिरी इथे झालेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मधुभाई निवडून आले. आपण 'कोकण मराठी साहित्य परिषदे'ची स्थापना करत असल्याची घोषणा त्यांनी या अध्यक्षपदावरून केली. या 'कोमसाप'साठी गेली १८ वर्षे त्यांनी तनमनधनाने अविश्रांत मेहनत करून वाङ्मयीन क्षेत्रात एक अद्भूतपूर्व इतिहास घडवला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये अनेक दौरे आणि कार्यक्रम करून हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांचे प्रचंड मोहोळ निर्माण केले. निरलस सेवाभाव, चोख आर्थिक व्यवहार, सुयोग्य नियोजन आणि वाङ्मयीन चैतन्य हे आपल्या व्यक्तिमत्त्वातील गुण त्यांनी संस्थेच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकडे संक्रमित केले. खेड्यापाड्यांतील शेवटच्या माणसापर्यंत साहित्य विचार कसा पोहचवावा, याचे एक आदर्श उदाहरण आपल्या कृतिशीलतेने मधुभाईंनी महाराष्ट्राला घालून दिले. 'कोमसाप' ही मधू मंगेश कर्णिक यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजे एक अभिजात महाकादंबरी आहे, असे वाङ्मयीन बुजुर्ग म्हणतात. या संस्थेच्या ५० शाखांच्या जाळ्यातून सांस्कृतिक उपक्रम सतत चाललेले असतात. मधुभाईंच्या मार्गदर्शनाखाली 'झपूर्झा' हे संस्थेचे द्वैमासिक निघते. गेल्या १८ वर्षांत ५० पेक्षा अधिक जिल्हा साहित्य संमेलने आणि ११ मुख्य साहित्य संमेलने 'कोमसाप' तर्फे आयोजित करण्यात मधुभाईंनी पुढाकार घेतला. केवळ कोकणातलेच नव्हे तर महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील थोर साहित्यिकांनी या संमेलनांमधून सहभागी होऊन मधुभाईंच्या सर्वस्पर्शित्वाला दाद दिली. आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांच्या मालगुंड या जन्मग्रामी त्यांचे स्मारक उभारून मधू ५८ मंगेश कर्णिक यांनी ऐतिहासिक कार्य केले. १९९३ एकमेव कविस्मारक आहे. मराठी भाषिकांचे ते 'काव्यतीर्थ' झालेले आहे. भारतातील असंख्य मराठी प्रेमी दरवर्षी हजारोंच्या संख्येने या स्मारकाला भेट देतात. कवी केशवसुतांचे १८६६ पूर्वीचे जन्मघर, तत्कालीन वस्तूंचे प्रदर्शन, स्मारकाची भव्य वास्तू, आधुनिक मराठी कवितेतील नामवंतांची माहिती करून देणारे प्रशस्त काव्यदालन, खुला रंगमंच, कविता संदर्भ ग्रंथालय व अभ्यासिका, केशवसुत उद्यान व काव्यशिल्पे हे सारे पाहून मधू मंगेशांच्या कलात्मक दूरदृष्टीला मराठीप्रेमी दाद देतात. अखंड उद्यमशीलता, सौजन्यशील स्वभाव, अथक कार्यक्षमता, संघटन कुशलता आणि वाङ्मयीन सर्जनशीलता या गुणसमुच्चयाने 'मधू मंगेश कर्णिक' ही आता केवळ सही राहिलेली नाही. ती एक अमीट नाममुद्रा झाली आहे. संदर्भ : १. 'आरती'; एप्रिल-मे २००१. २. 'ललित'; दिवाळी १९८७. ३. 'ललित'; जुलै १९९४. ४. 'कार्तिक'; दिवाळी १९९९. कर्वे, इरावती दिनकर डॉ. महेश केळुसकर ललित निबंधकार, मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्राच्या संशोधक १५ डिसेंबर, १९०५ ते ११ ऑगस्ट, १९७० इरावती बाईंचा जन्म ब्रह्मदेशात 'Myingin' येथे झाला. वडिलांचे नाव हरी गणेश करमरकर व आईचे नाव भागीरथीबाई. त्यांना पाच भाऊ होते, बहीण नव्हती. त्यांचे मूळ नाव 'गंगा' होते नंतर इरावती ठेवले. पण घरामध्ये सर्व जण 'माई' म्हणत. वयाच्या सातव्या वर्षीच त्या पुण्याच्या हुजूरपागा या शाळेत शिक्षणासाठी आल्या. १९२२ साली मॅट्रिक व १९२६ साली फर्गसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान हा विषय घेऊन प्रथम शिल्पकार चरित्रकोश