पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७८)

भाषणांत भाववाचक नामें अगदी कमी असतात. ती जसजशी जास्त जास्त वापरण्यांत येतील तसतसा सामान्यबोध हा व्यापार जास्त होऊ लागला असे समजावे. ही स्थिति बारा वर्षांपुढे होते. सामान्यबोध बरोबर न झाल्यास भाषेत येणारे शब्दहि थोडे ढिलेच असतात; म्हणजे त्यांपासून जो अर्थवोध व्हावयास पाहिजे तो होत नाही; व याच शब्दांचे प्रतिकार्य पूर्वी झालेल्या सामान्य बोधावर होऊन तो जास्तच अंधक होतो. यासाठी मुलांना शब्दांचा खरा अर्थ समजल्याशिवाय त्यांचा उपयोगच करूं देऊ नये. असो. आतां आपण शाळांतून या शक्तीचा कसा विकास करितां येईल ते पाहू.

गोषवारा.

 सामान्यबोधशक्तिः-सामान्यनामांनी दर्शविलेल्या कल्पना ग्रहण करणारी शक्ति ही शक्ति नसती तर स्मरणशक्तीवर फार ताण पडला असता.
 सामान्य ज्ञासामान्य न व विशेष ज्ञान यांचा निकट संबंध आहे.
 सामान्य बोधाचें घटकावयवः—निरीक्षण; तुलना; निष्कर्ष; सामान्यभावग्रहण.
 सामान्यज्ञान पुष्कळ वेळां कां चुकीचे असते त्याची कारणे :- अस्पष्ट बोध, अपुरें निरीक्षण, अपूर्ण निष्कर्ष, अर्थाकडे लक्ष न देतां शब्दांचा उपयोग करणे व स्मृतीचा बरेवाईटपणा इत्यादि.

 सामान्यबोधशक्तीची वाढ:-दुसऱ्या वर्षी विचारशक्ति दिसू लागते. मुलें —'तुलना' हा व्यापार करू लागली की, विचार-शक्तीचा उदय झाला असे समजावे. सामान्यबोध आरंभी अगदी ढोबळ स्वरूपाचा असतो. मुलांच्या भाषणांत भाववाचक नामें येऊ लागली म्हणजे सामान्यबोधशक्तीचा बराच विकास झाला असें समजावे. ही स्थिति साधारणपणे बाराव्या वर्षी होते.