पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७९)
भाग दहावा.
सामान्यबोधशक्ति व शिक्षकांचे कर्तव्य.

 सामान्यबोध होण्यास मनावर एक प्रकारचा ताण पडतो. कारण हा व्यापारच थोडा गहन आहे. मुले मोठ्या हौसेनें कांहीं कांही विशेष वस्तूंकडे लक्ष देतात. परंतु त्यांतील सामान्यभाव ग्रहण करण्याचा त्यांना स्वाभाविकच कंटाळा असतो, अशी पुष्कळ शिक्षकांची नेहमी ओरड ऐकिवांत येते. परंतु याचा दोष मुलांकडे नसून ज्या पद्धतीने त्यांना शिक्षण देण्यांत येते तीकडे आहे. उदाहरणार्थ,- व्याकरणांतील कठीण कठीण भाग प्रथमच एकदम मुलांस शिकवावयास लागणे. व्याकरण शिकल्याने अमुक समजतें, व्याकरणाचे भाग अमुक आहेत, वर्णविचार म्हणजे काय, वगैरे नीरस गोष्टीत मुलांना काय मजा वाटणार ? तसेंच एकदम व्याख्या पाठ करावयास लावणे व अपरिचित अशा शब्दांची एक मालिका मुलांपुढे टाकून त्यायोगे त्यांना गोंधळून टाकणे ही सदोष शिक्षणपद्धति होय. हिचा मुलांना तिटकारा येणे स्वाभाविकच आहे. आपण नेहमी पाहातों की, निरनिराळया वस्तूंमधील साम्य हुडकून काढण्याकडे मुलांची स्वाभाविक प्रवृत्ति असते व त्यांत त्यांना मजा वाटते. या गोष्टीचा शिक्षकांनी उपयोग करून घेतला पाहिजे. प्रथम अगदी सोपे पाठ घ्यावे. अवश्य वाटेल त्या ठिकाणी स्पष्टीकरणार्थ उदाहरणे घ्यावी व ती परिचित अशीच घ्यावी. असे केले म्हणजे सामान्यसंकलन ही क्रिया मुलांना सुलभ व चित्ताकर्षक होईल. विचारशक्तीचा विकास करितांना निरीक्षणशक्तीचा उपयोग करावा. मुलांचे समोर काही निवडक वस्तु मांडाव्या. त्यांचे गुणधर्म काय आहेत हे त्यांच्याकडून प्रश्न करून काढून घ्यावे व नंतर त्यांना त्या वस्तूंतील साम्य व भेदभाव शोधून काढण्यास लावावें. मुलांस पदार्थांचे जातीतील सामान्यभाव ग्रहण करितां येऊ लागले व त्यांचा एक स्वतंत्र वर्ग करण्याची शक्ति आली म्हणजे सामान्यबोधशक्तीचा बराच विकास झाला असें सम-