पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)


सार शक्य तेवढ्या सोप्या भाषेत आणण्याचा यत्न केला आहे. हा यत्न कितपत सफल झाला आहे हे ठरविण्याचे काम विद्वज्जनसमूहाचे आहे. प्रस्तुत पुस्तकांत शास्त्रीय शब्द अगदी अवश्य तेवढेच आणिले आहेत. यांपैकी काही शब्द रूढ आहेत व काही नवीन आहेत. अर्थबोध स्पष्ट व्हावा म्हणून काही शब्द जरा लांबलचक झालेले आहेत. या शब्दांऐवजी जर कोणी दुसरे लहान व सुबोध शब्द सुचवितील तर मी त्यांचा फार ऋणी होईन.
 हे पुस्तक छापण्यापूर्वी मे. डायरेक्टर साहेब मुंबई शाळाखाते यांचेकडे पाठविले होते. त्यांचेकडून लिहून आल्याप्रमाणे पुस्तकांत ठिकठिकाणी दुरुस्ती केली आहे. या पुस्तकाची प्रुफै तपासण्याचे कामी रा. रा. विनायक त्रिंबक मोडक यांनी मला फार मदत केली तीबद्दल त्यांचे आभार मानून व इंदिरा प्रेसचे मालक रा. रा. त्र्यंबक हरी आवटे यांनी पुस्तक शक्य तितकें लवकर छापून दिले याबद्दल त्यांचे आभार मानून ही लहानशी प्रस्तावना पुरी करितों.
 ज्या इंग्लिश पुस्तकांचे आधारे हे पुस्तक लिहिले त्यांची नांवें.--
Sully's Hand-book of Psychology.
Psychology in the School-room by Dexter and Garlic.
Children's ways by Sully.
Fitche's Lectures on teaching.
Jame's Talks to teachers on Psychology.

ना. कृ. भावे.