पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.


 एका प्रसिद्ध ग्रंथकाराने म्हटल्याप्रमाणे शिक्षणसंबंधी विचार करितांना तीन गोष्टींचा विचार केला पाहिजे.- शिक्षक कोण, शिकवावयाचे काय व कोणास. यांपैकी पहिल्या दोन गोष्टींविषयी मात्र आजपर्यंत बराच खल झालेला आहे. 'शिकवावयाचें कोणास' या महत्त्वाच्या प्रश्नाकडे अलीकडे शिक्षक वर्गाचे लक्ष जात चालले आहे ही समाधानाची गोष्ट आहे. ( Study the subject you have to act upon )ज्यांस शिक्षण द्यावयाचे असेल त्यांची चांगली ओळख करून घ्या----हे महत्त्वाचे तत्त्व प्रथम रूसो या प्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्त्याने युरोपांतील शिक्षक वर्गाचे नजरेसमोर आणिलें. पेस्टेंलोझी व फ्रोबेल या सुप्रसिद्ध शिक्षकांनीहि हीच गोष्ट स्पष्ट व जोरदार भाषेत सांगितली. एकोणिसावे शतकाचे शेवटी शेवटी यूरोपांतील शिक्षक वर्गास या गोष्टीचे महत्त्व समजू लागले. व त्यावेळेपासून ट्रेनिंग कॉलेजांतील शिक्षणक्रमांत मानसशास्त्रास अग्रस्थान मिळू लागले. असो. आमचे इकडील ट्रेनिंग कॉलेजांतहि अलीकडे मानसशास्त्र हा विषय शिकवू लागले आहेत. परंतु या विषयावर मराठी भाषेत मुळीच पुस्तक नाही. ही उणीव भरून काढावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक कोणत्याहि एकाच पुस्तकाचे भाषांतर नसून यांत तीनचार पुस्तकांचे