पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२५)
गोषवारा.
उच्च भावना; बौद्धिक उच्च भावना.

 बौद्धिक व्यापारांपासून या भावनांची उत्पत्ति होते. मुलांची जिज्ञासा या भावनांपैकींच होय.
 कुतूहल:- कुतूहल हे जिज्ञासेचे कारण होय. कुतूहलापासून जिज्ञासा जागृत होते व म्हणूनच मुले नानातऱ्हेचे प्रश्न विचारतात. बौद्धिक भावनांत काही सुखाचा अंश असतो व काही दुःखाचाहि अंश असतो. निरनिराळ्या बौद्धिक व्यापारांपासून निरनिराळ्या भावना उत्पन्न होतात.
 बौद्धिक भावनांची वाढ; मुलांची जिज्ञासा:- (१) मुलांची जिज्ञासा क्षणिक व जोरदार असते; (२) जिज्ञासा टिकण्यास अभिरुचि पाहिजे; ( ३ ) जिज्ञासा परिस्थिति व नैसर्गिक कल यांवर अवलंबून असते.
 बौद्धिक भावनांचे शिक्षणः- (१) जो विषय शिकवावयाचा त्यांत अभिरुचि उत्पन्न केली पाहिजे; (२) विषयाची मांडणी व्यवस्थेशीर पाहिजे; ( ३ ) मुलांच्या प्रश्नांची शक्य असेल तेथे उत्तरे देऊन त्यांचे समाधान करून त्यांची जिज्ञासा वाढवावी; ( ४ ) जिज्ञासा वाढविण्यास वस्तुपाठ हा विषय बराच उपयोगी पडतो.

भाग सतरावा.
-:०:-
सौंदर्यविषयक उच्च भावना.

 नेत्र व कर्ण या इंद्रियांना विकृति झाली म्हणजे त्या विकृतीमुळे पुढे काहीतरी बोध हा होतोच; व त्याबरोबर एक प्रकारच्या भावनाहि उत्पन्न होत असतात. यांसच सौंदर्यविषयक उच्च भावना हे नांव देतात. याचे स्पष्टीकरणार्थ एकदोन उदाहरणे देऊ. (१) समजा की आपले समोर एखादें चित्र आहे. राजा