पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिक्षण व मानसशास्त्र.
भाग पहिला.

 मानसशास्त्र म्हणजे ज्या शास्त्रात मनाचे शास्त्रीयदृष्ट्या निरीक्षण केलेले असते, ते शास्त्र. ज्याप्रमाणे रसायनशास्त्रात पदार्थ, त्यांची घटना, त्यांचे गुणधर्म, त्यांचे इतर पदार्थांवर रासायनिक कार्य वगैरेसंबंधी माहिती सांगितलेली असते, त्याचप्रमाणे मानसशास्त्रांत मन म्हणजे काय, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याचे निरनिराळे व्यापार कोणते व या निरनिराळ्या व्यापारांचा उपयोग काय वगैरेसंबंधी माहिती दिलेली असते.

मन म्हणजे काय?

 परमेश्वराने मनुष्यमात्राचे ठिकाणी काहीतरी एक अद्भुत शाक्त घालून ठेविली आहे. या शक्तीमुळेच आपणांस ज्ञान होते, सुखदुःखादि भावना होतात व आपण कोणतेंहि कार्य करण्यास प्रवृत्त होतो. याच शक्तीस मन म्हणतात. 'हवा काय आहे ती दाखवा' असें जर कोणी म्हणेल, तर ती जशी दाखविता येणार नाही, तद्वत् मनहि दाखविता येणार नाही, कारण मन ही दृश्य वस्तु नाही. परंतु मन म्हणून काही तरी आहे इतकें मात्र मनाच्या व्यापारांवरून सिद्ध करितां येते.

शिक्षण व मानसशास्त्र.

 थोडक्यात सांगावयाचे म्हणजे, वैद्यलोकांस ज्याप्रमाणे शरीर