पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. बच्चन यांनी आपल्या या काव्यकृतीत जीवनाच्या एका मधुर भावविश्वाचे चित्रण केले आहे. त्याची ‘वासनाकांड' म्हणून भलावण करणे कितपत न्याय्य आहे? बच्चन जर भोगवादी, विकारग्रस्त कवी असले असते तर...

 ‘वासना जब तीव्रतम थी

 बन गया था संयमी मैं

 हो रही मेरी क्षुधा ही

 सर्वदा आहार मेरा!'

 सारख्या विवेकशील काव्यपंक्ती त्यांनी लिहिल्या असत्या का, याचा विचार तटस्थपणे व्हायला हवा. 'मधुशाले’ला पन्नास वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने का असेना, बच्चन यांच्या या मधुकाव्याचे पुनर्मूल्यांकन व्हायला हवे.

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/३९