पान:शंकराचार्य जीवन चरित्र.djvu/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिप्राय या पुस्तकास पुणे येथील आचार्यकुलाचे संस्थापक, ' आचार्य' मासिक, व आचार्य वर्णाश्रमधर्म पाक्षिक पत्राचे विद्वान संपादक श्री. वे. शा. सं. शास्त्रसुधाकर विष्णुशास्त्री वापट यांनी दिलेला अभिप्राय । रा. वासुदेव विष्णु कवि यांनी श्रीमत् आद्य शंकराचार्य यांचे चरित्र' या नांवाचा एक गद्य-पद्यात्मक लहानसा प्रबंध लिहिला आहे. काही वर्षापूर्वी केरळकोकिळ मासिकाचे संपादक रा. आठल्ये यांनी आचार्याचे समग्र चरित्र मराठीत लिहून प्रसिद्ध केले होते, पण ते आतां दुर्लभ झाले आहे. त्यानंतर श्री. रा. रा. महादेव राजाराम बोडस, मुंबई, यांनी आचार्याच्या चरित्राविषयी सविस्तर प्रबंध लिहिला आहे. पण तो सामान्य व श्रद्धाळू वाच- कांच्या फारसा उपयोगी पडण्यासारखा नाही. कारण त्यांनी तो आधुनिक चिकित्सकांच्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पण या लहानशा प्रबंघांत रा. कवि यांनी महाराष्ट्रांतील श्रद्धाळु आबालवृद्ध स्त्रीपुरुषांना आचार्याच्या चरित्राचे संक्षिप्त ज्ञान व्हावें म्हणून हा यत्न केला आहे. माझ्या दृष्टीने तो बराच चांगला झाला आहे. या अल्प ग्रंथाच्या वाचनाने सर्व वाचकांस आचार्याच्या चरित्राचे व कार्याचे सामान्य ज्ञान होईल यांत संशय नाही. ग्रंथकार ही आपली कृति श्रीमत् जगद्गुरु श्रीशंकराचार्य (श्री. शिरोळकरस्वामी ) यांचे चरणी उत्सवप्रसंगी अर्पण कर- णार आहेत, हा त्यांतल्यात्यांत विशेष आहे. श्रीआचार्यजयंतीच्या निमित्ताने रा. कवि यांनी केलेल्या या अपेक्षित कार्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. - पुणे आचार्यभक्त चैत्र श्रु॥ १४ शके विष्णशास्त्री बापट, १८५३ 'संस्थापक, आचार्यकुल पुणे.'