पान:व्यायामशास्त्र.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४६ ] नंतर हात व डोके पुढे आणीत आणत ट्रांच खाली टेकवावी. हात मागे नेत असतां जोराने पण सावकाश श्वास घ्यावा, व हात पुढे आणीत असतां जोराने पण सावकाश श्वास सोडावा. । या कसरतीने पावलाचे व छातीचे स्नायूस ( विशेष थकवा न येतां ) व्यायाम घडेल. । व्यायाम ५ वा. अ. हात दोन्ही बाजूंस पसरून उभे रहावे. | उजवा पाय व उजवा हात वर करीत व चक्राकार फिरवीत कमरेजवळ डाव्या आंगास बांकावे. नंतर असेच उजव्या आंगास वांकावें. । यायोगे पोटाच्या बाजूचे स्नायूंस व पायाचे अपकर्षक स्नायूस व्यायाम मिळेल. ब. पावलांमध्ये दीड हात अंतर ठेऊन उभे राहावे. नंतर तोंड व धड उजवीकडे वळवावे; हात ताठ पसरून धरावे व हाताच्या मुठी मिटाव्या. डाव्या हाताची मूठ भुईस लागे तोपर्यंत डाव्या बाजूकडे कमरेत वांकावे. | नंतर ताठ उभे होऊन डाव्या बाजूकडे धड वळवून पूर्वीप्रमाण उजव्या हाताची मूठ भुईस टेके तोपर्यंत उजव्या बाजूकडे कमरेत वांकावे. याप्रमाणे प्रत्येक बाजूस पांच पांच वेळां वांकावे. . या व्यायामाने पोटाच्या बाजूचे स्नायु व यकृत् यांस बळकटी येते.