पान:व्यायामशास्त्र.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४६ ] शास्त्रीय व्यायामपद्धतीचा एक नमुना. | व्यायाम १ ला. | जोर काढावे. म्हणजे हाताच्या, छातीच्या, व पाठीच्या स्नायूंना व्यायाम मिळेल. जोर काढतांना मान खालींवर चांगली वांकवावी, म्हणजे मानेच्या स्नायूंस व्यायाम मिळेल. व्यायाम २ रा. उठाबशा काढाव्या. त्यांच्या योगाने पायाचे व कुमरेचे स्नायूंस व्यायाम मिळेल. | व्यायाम ३ रा. अ. जमिनीवर उताणे ताठ निजून एक एक पाय अनुक्रमाने वर आणावा व नंतर खालीं न्यावा. असेच दोन्ही पायांनी एकदम करावे. व. ताठ उभे राहून हात वर करावे. नंतर हात भुईस टेकेतोंपर्यंत कमरेत वांकावे व नंतर ताठ व्हावे. वरील दोन्ही व्यायाम अनेक वेळा करावे. या कसरतीचे योगाने पोटाचे स्नायूंस व्यायाम घडेल. | व्यायाम ४ था. उभे राहून हात पुढील बाजूस ताठ पसरावे. हात आडव्या पातळीत सावकाश फिरवून मागे यावे व असे करीत असतां टांचा सावकाश वर उचलून चवड्यावर उभे रहावे. हात मागे जातांना मान मागें न्यावी व छाती पुढे आणावी.