पान:व्यायामशास्त्र.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ४१ ] | ३ शत्रूचा तेव्हांच पराजय करू अशी मनाची खात्री झाल्यामुळे अंगीं धीटपणा येतो. ४ चलाखी येते. | सशास्त्र तालीम. १ सर्व स्नायूंस व्यायाम मिळतो. २ शरिराचा एखादा भाग दुर्बल असल्यास त्याची दुर्वलता घालविता येते. ३ थोडा वेळ पुरतो. ४ व्यायाम क्रमाक्रमाने वाढवितां येतो. | ५ शक्ति व आरोग्य वाढविण्यास हा व्यायाम फार उपयोगी पडतो. पूर्ण ( निर्दोष ) व्यायामपद्धति. व्यायामांच्या भिन्न प्रकारांतील जे दोष दाखविले आहेत, त्यांवरून असे दिसून येईल की, व्यायामापासून जी इष्टसिद्धि व्हावयाची असते, ती पूर्णपणे होण्यास व्यायामाचा कोणताही एक प्रकार पुरेसा नाहीं. अशी स्थिति असल्यामुळे व्यायामाचा पूर्ण फायदा व्हावा अशी ज्यांना इच्छा असेल त्यांनी, व्यायामाच्या मुख्य तीन प्रकारांपैकी प्रत्येक प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. म्हणजे अंगांत धाडस, चापल्य व प्रसंगावधान येण्यास (१) शिकार केली पाहिजे; (२) सहानुभूति, हस्तकौशल्य, उल्लसितवृत्ति यांची वाढ होण्यास खेळ खेळले पाहिजेत, आणि (३) शिकार अथवा खेळ यामुळे