पान:व्यायामशास्त्र.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १० } जठर व आंतडी यांमधून अन्न जात असतां, या इंद्रियांमध्ये ज्या सूक्ष्म नालिका (श्वेतरसवाहिन्या) असतात त्या अन्नांतील पोषक रस शोषून घेतात. रक्ताभिसरणाचीं इंद्रिये । रक्ताशय, फुप्फुसे व शाररांतील सर्व रक्तवाहिन्या या सर्वांस मिळून रक्ताभिसरणाचीं इंद्रिये म्हणतात. काळीज, किंवा हृदय अथवा रक्ताशय हा रक्ताचा खजिना होय व फुफ्फुसे रक्तशुद्धीचे स्थान होय. रक्ताशय-रक्ताशयाची दोन पुढे अथवा भाग आहेत. पैकी डावे पूड शुद्ध रक्ताचा खजिना होय. या खजिन्यांत रक्त सांचून राहत नाहीं, तर तेथे ते आलें कीं, लागलीच पुढील मार्गास लागतें हैं लक्षात ठेवावे. रक्ताशयाच्या दोन पुडांचा संकोच व विकास आळीपाळीने एकसारखा चालू असतो. छातीवर हात ठेवला असतां काळजाचे धडधडणे हातास लागते, ते हेच होय. रक्ताशयाचा एकदम विकास झाला असता त्याचे शेवट छातीच्या आतील बाजूवर आपटतें; त्यायोगाने धड् धड् असा आवाज होतो. | निरोग प्रौढ मनुष्याच्या रक्ताशयाचा संकोच-विकास मिनिटांत ७० वेळां होतो. रक्ताशयाच्या डावे पुडाचा संकोच झाल्याबरोबर जो शुद्ध रक्ताचा प्रवाह निघतो, तो शिरांतून जात असत शिरेस फुगवटी येऊन शीर उडल्यासारखी वाटते. नाडी ही एक शुद्ध रक्ताची शीर आहे, व रक्ताशयाचा संकोच जितक्या