पान:व्यायामशास्त्र.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ११ ] वेळीं होते तितक्या वेळां ही शीर फुगते व उडल्यासारखी हातासे लागते. म्हणून नाडी पाहिल्याने रक्ताशयाचा संकोच-विकास कसा चालला आहे हे समजते. | रक्ताशयापासून एक मोठी धमनी निघते. तीस फाटे फुटून ते सर्व शरिरांत पसरले आहेत. या सर्वांना रक्तवाहिन्या म्हणतात. या फाट्यांचे शेवटच्या रक्तवाहिन्या फारच सूक्ष्म केसाहूनही बारीक-आहेत. या सूक्ष्म रक्तवाहिन्या जेथे नाहीत असा शरिराचा कोणताही भाग नाहीं. या सर्व नालकांतून रक्ताचा प्रवाह एकसारखा चालू असतो. शरिरांतील प्रत्येक हालचालीबरोबर शरिराचा कांहीं भाग झिजत असतो. झिजलेला भाग भरून काढणे व झीज झालेल्या ठिकायाचे निर्जीव कण जाळून त्यांचा कार्बानिक असिड वायु बनावणे हे काम रक्ताचे आहे. हे काम करीत रक्त सर्व शारिरांतून हिंडत असते. | रक्ताशयातून रक्त निघाल्यावर, ते शरिराची झीज भरून काढण्याचे काम करीत करीत रक्तवाहिन्यांचे शेवटापर्यंत जाते. ही शेवटें शरिराच्या सर्व भागांत आहेत. तेथून ते परत फिरते त्यावेळी त्याचा रंग निळसर होतो. मग हे निळसर अशुद्ध रक्त दुस-या नळ्यांनी ज्यांस अशुद्धरक्तवाहिन्या म्हणतात त्यांनी ) परत येऊन रक्ताशयाच्या उजव्या पुडांत जाते. तेथून ते फुफ्फुसांत जाते. तेथे रक्त शुद्ध होऊन रक्ताशयाच्या डाव्या पुडांत जाते व तेथून फिरून बाहेर पडून त्याचा पूर्वीप्रमाणे क्रम चालू होतो. शुद्धरक्तवाहिन्या व अशुद्धरक्तवाहिन्या यांच्या शेवटीं ज्या